फोटो सौजन्य - Social Media
यश हा मिळतोच पण त्यासाठी प्रयत्नांमध्ये कमतरता नसावी. अपयश ही यशाची पायरी असते. प्रयत्नांमध्ये कमी पडू न देता, प्रत्येकवेळी त्याच उत्साहाने आणि त्याच जोमाने काम केले कि नक्कीच आपल्याला यश मिळतोच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे IAS मनीषा धार्वे. मनीषाच्या या IAS बनण्याच्या प्रवासात अनेक अडथळे आले तसेच अनेक अपयश आले परंतु तिने कधी माघार घेतली नाही. तिच्या प्रयत्नांमध्ये कधी कमीपणा भासू दिला नाही. UPSC २०२३ च्या परीक्षेत तिने देशातून २५७ वी रँक मिळवली होती. चला तर मग जाणून घेऊयात, IAS मनीषा धार्वे यांची यशोगाथा:
जनजातीय समुदायामधून येणाऱ्या मनीषाने तिच्या समुदायाचे नाव उंचावले आहे. त्या क्षेत्रातून IAS बनणारी मनीषा पहिली आदिवासी मुलगी आहे. मनीषाचे आई वडील शिक्षक आहेत. मनीषाचे वडील गंगाराम अभियंता होते. त्यानंतर त्यांनी शिकवणी देण्यास सुरुवात केली. समाजातील मुलांना शिकवता यावे, यासाठी त्यांनी शिकवणी देण्यास सुरुवात केले. इतकेच नव्हे तर गंगाराम यांनी त्यांच्या मुलांचे शिक्षणही स्थानिक सरकारी शाळांमधून केले. मनीषा तिच्या घरातील मोठी मुलगी आहे. तिला लहान भाऊदेखील आहे. तो देखील सध्या UPSC ची तयारी करत आहे.
मनीषा धारवेने शिक्षणाची सुरुवात अंगणवाडीतुन केली. स्थानिक अंगनवाडीमध्ये तिने शिकण्यास सुरुवात केले. येथे जवळजवळ ५ वर्ष शिक्षण घेत. तिने पहिली ते आठवी इयत्तेपर्यंतचे शिक्षण गावाच्या स्थानिक सरकारी शाळेमध्ये घेतली. तसेच ९वी ते १२वीचे शिक्षण स्थानिक क्षेत्रातील उत्कृष्ट विद्यालयात केले. दहावीमध्ये मनीषाने ७५% गुण मिळवले. तर बारावीमध्ये ७८% गुण मिळवले. सर्वात विशेष बाब म्हणजे ११वीमध्ये मनिषाने गणित आणि बायोसारखे विषय अभ्यासण्यासाठी घेतले होते. BSC कॉम्प्युटर सायन्स तसेच PSC चे शिक्षण घेऊन, तिला तिच्या मित्रांनी UPSC च्या परीक्षेचा विकल्प सुचवला. कठोर अभ्यास करून तिने कलेक्टर बनण्याचा निर्धार केला. या प्रयत्नांमध्ये तिला अनेकदा अपयश आले.
मनिषाने २०२० मध्ये पहिल्यांदा UPSC ची परीक्षा दिली होती. पण त्यामध्ये ती असफल ठरली. यानंतर २०२१ मध्ये तिने पुन्हा परीक्षा दिली, यामध्ये ही तिला अपयशयाला सामोरे जावे लागले. त्यानंतर तिने पुन्हा परीक्षा दिली, पण यावेळीही अपयशाशिवाय हाती काही लागले नाही. शेवटी, २०२३ मध्ये केलेले अपार कष्ट सार्थकी लागले आणि मनीषा धार्वे ‘IAS मनीषा धार्वे’ झाली.