फोटो सौजन्य - Social Media
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)ने भरतीच्या प्रक्रियेचे आयोजन केले आहे. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये १५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ट्रेड फायनांस ऑफिसरच्या पदांना भरण्यासाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. बँकिंग क्षेत्रात काम करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. भारतातील विविध शहरांतील विविध शाखांमध्ये उमेदवारांक्सची नियुक्ती करण्यात येणार आहे. मुळात, या संबंधित अधिसूचना जाहीर करण्यात आलो आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी SBI च्या bank.sbi/careers या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ३ जानेवारी २०२५ पासून सुरु करण्यात आली आहे. एकंदरीत, या भरतीमध्ये सहभाग घेऊ पाहणारे उमेदवार आजपासून अर्ज करू शकतात. तसेच उमेदवारांना २३ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे, परंतु या संदर्भात तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कम भरावी लागणार आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपये भरावे लागणार आहे. तसेच OBC आणि EWS या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून सारखीच रक्कम भरावी लागणार आहे. या भरतीसंबंधित विशेष बातमी अशी आहे कि SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज निशुल्क करता येणार आहे. PwBD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अर्ज निशुल्क करता येणार आहे.
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांन अर्ज करण्यापूर्वी काही पात्रता निकषांना पात्र करणे अनिवार्य आहे. ही पात्रता निकष शैक्षणिक आहेत, तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादे संबंधित आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना या निकषांना पात्र करणे गरजेचे आहे. एकंदरीत, या अटी शर्ती अधिसूचनेमध्ये नमूद आहेत. अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या शैक्षणिक अटीनुसार, अर्ज कर्ता उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. किमान २३ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवाराला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच जास्तीत जास्त ३२ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज कर्त्या उमेदवारांना त्याच्या गुणांच्या आणि कौशल्यांचा आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल तसेच त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.