Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहू महाराज जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप; महापुरुष जयंती उत्सव समितीचा उपक्रम

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त पोलादपूरमध्ये महापुरुष जयंती उत्सव समितीने आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजप्रबोधनाचा आदर्श उपक्रम राबवला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 01, 2025 | 08:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

आरक्षणाचे जनक आणि सामाजिक क्रांतीचे अग्रदूत छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती २६ जून रोजी संपूर्ण देशभरात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर पोलादपूर तालुक्यातील महापुरुष जयंती उत्सव समितीने एक स्तुत्य उपक्रम राबवत आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.

Ashadhi Wari : वारकऱ्यांसदर्भात महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; वारीदरम्यान मृत्यू झाला तर मिळणार इतक्या लाखांची मदत

३० जून २०२५ रोजी प्राथमिक शाळा पवारवाडी, पार्लेवाडी, गुडेकर कोंड व नाणेघोळ आदिवासी वाड्यांमधील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास वाकड ग्रामपंचायतीचे सरपंच शांताराम जंगम, उपसरपंच सौ. बाबर, नीलकंठ साने, तसेच संबंधित शाळांचे मुख्याध्यापक संतोष शेलार, मनोज सकपाळ, सोनावणे, समीर सालेकर आणि समितीचे संदीप जाबडे, विवेकांत मोरे, अरुण मोहिते, अमित वाडकर, नरेश मोरे, सिद्धेश पवार, मंथन मोरे, नरेश यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमादरम्यान बोलताना संदीप जाबडे यांनी सांगितले की, “महापुरुषांची जयंती ही फक्त पूजनापुरती न राहता, त्यांच्या विचारांचे स्मरण करणारी आणि समाजातील गरजूंना मदतीचा हात देणारी झाली पाहिजे. आम्ही मागील चार वर्षांपासून स्वखर्चातून ही साहित्यवाटपाची परंपरा जपतो आहोत.” अरुण मोहिते यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीमुळे शिक्षणात अडथळे येतात. अशा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे यासाठी आम्ही हे साहित्य वाटप करतो.”

‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाचा नवी मुंबईत उत्साहात प्रारंभ!

विवेकांत मोरे यांनी शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक धोरणांचा उल्लेख करत सांगितले की, “शाहू महाराजांनी दिलेला शिक्षणाचा अधिकार आणि जातीव्यवस्थेविरुद्ध उभारलेला आवाज यामुळेच महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांती घडली.” हा उपक्रम शालेय पातळीवर सामाजिक बांधिलकी जोपासणारा असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासात सकारात्मक योगदान देणारा ठरतो आहे. अशा उपक्रमातूनच शाहू महाराजांचे विचार समाजात रुजतील आणि पुढच्या पिढीला योग्य दिशा मिळेल.

Web Title: Distribution of school supplies on the occasion of shahu maharaj jayanti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 08:38 PM

Topics:  

  • Rajarshi Shahu Maharaj

संबंधित बातम्या

Kolhapur News : राजर्षी शाहू महाराज न्यायनिवाडा करायचे, त्या दरबार हाॅलमध्ये सोहळा संपन्न
1

Kolhapur News : राजर्षी शाहू महाराज न्यायनिवाडा करायचे, त्या दरबार हाॅलमध्ये सोहळा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.