फोटो सौजन्य - Social Media
बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी काही गोष्टी लक्षात असणे फार महत्वाचे आहे. जर तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी उत्सुक आहात तर नक्कीच तुम्ही हे लेख शेवटपर्यंत वाचले पाहिजे. मुळात, बँकिंग क्षेत्रामध्ये विविध भरत्या सुरूच असतात. या भरत्यांसाठी अनेक इच्छुक उमेदवार अर्ज करू पाहतात. जर तुम्ही देखील अशा भारतीयांच्या माध्यमातून या क्षेत्रात उतरू पाहत आहात तर आजपासूनच बँकिंग क्षेत्रातील या काही महत्वाच्या परीक्षांचा अभ्यास सुरु करा. या क्षेत्रामध्ये भरघोष यश आहे, त्यामुळे अनेक कष्टकरू उमेदवार या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उत्सुक आहेत.
या लेखामध्ये बँकिंग क्षेत्रातील काही प्रमुख परीक्षांचे उल्लेख केला गेला आहे, या परीक्षांना दरवर्षी लाखोंच्या संख्येमध्ये उमेदवार उपस्थित राहत असतात.
IBPS PO
IBPS PO या परीक्षेचे आयोजन दरवर्षी इंस्ट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनद्वारे केले जाते. प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदासाठी ही भरती आयोजित केली जाते. पब्लिक सेक्टर बँकेमध्ये ही भरती केली जाते. या परीक्षेत लेखी परीक्षा तसेच मुलाखतीचा समावेश असतो. परीक्षेमध्ये रिजनिंग, टिव एप्टीट्यूड, इंग्लिश भाषा आणि जनरल अवेअरनेस संबंधित प्रश्न विचारले जातात.
IBPS Clerk
या परीक्षेचे आयोजन दरवर्षी बँकांमध्ये क्लार्कच्या पदांना भरण्यासाठी केली जाते. नियुक्तीच्या प्रक्रियेत प्रिलिम्स आणि मेन्स परीक्षेचा समावेश आहे. या परीक्षेमध्ये रिजनिंग, टिव एप्टीट्यूड, संगणकाविषयी ज्ञानासंबंधित आणि जनरल अवेअरनेस संबंधित प्रश्न विचारले जातात.
IBPS SO
IBPS SO या परीक्षेचे आयोजन इंस्ट्युट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनद्वारे केले जाते. SO म्हणजेच स्पेशियालिस्ट ऑफिसर. कृषी क्षेत्र अधिकारी, मार्केटिंग अधिकारी, एचआर अधिकारी, आयटी अधिकारी, कायदा अधिकारी आणि राजभाषा अधिकारी पदांना भरण्यासाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते. नियुक्तीच्या प्रक्रियेमध्ये प्रिलिम्स, मेन्स परीक्षा आणि मुलाखतीचा समावेश आहे.
SBI PO and SBI SO
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO) आणि स्पेशियालिस्ट ऑफिसर (SO)च्या पदांना भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला SBI च्या कोणत्याही ब्रांचमध्ये रुजू केले जाईल.
SBI Clerk
एसबीआय क्लर्क परीक्षा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदांसाठी भरती करण्यासाठी आयोजित केली जाते. या परीक्षेद्वारे उमेदवारांच्या विचारशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता, सामान्य इंग्रजी आणि वित्तीय जागरूकतेचे मूल्यमापन केले जाते.