फोटो सौजन्य - Social Media
टेक्सटाईल्स कमिटी रिक्रुटमेंटमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एकूण ४९ रिक्त जागांना भरण्यासाठी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या भरतीच्या माध्यमातून डेप्युटी डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर, क्वालिटी अशुरन्स ऑफिसर, स्टॅटिस्टिकल ऑफिसर अशा अनेक विविध पदांना भरण्यात येणार आहे. तसेच देशभरात विविध ठिकाणी या भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र असणे अनिवार्य आहे.
टेक्सटाइल कमिटीच्या या भरतीसाठी 23 डिसेंबर तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांना 31 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. उमेदवारांच्या नियुक्तीसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, अद्याप या तारखेला जाहीर करण्यात आले नाही. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ग्रुप A साठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 1500 रुपये अर्ज शुल्क करायचे आहे. मुळात, हे अर्ज शुल्क सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी तसेच ओबीसी, EWS आणि Ex SM प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी आहे.
एससी, एसटी तसेच PwBD या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क मोफत करता येणार आहे. ग्रुप B आणि C पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून 1000 रुपये भरायचे आहेत. ही रक्कम सामान्य श्रेणीतील उमेदवारांना तसेच ओबीसी, EWS आणि Ex SM प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संबंधीत आहेत. अर्ज करता उमेदवाराकडे अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 20 वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
तसेच कमाल वय 35 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. विविध पदांसाठी विविध शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांनी जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत अधिक 3 वर्षांपर्यंत सूट मिळेल. SC तसेच ST प्रवर्गातील उमेदवारांना अधिक 5 वर्षांपर्यंत सूट मिळेल. PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अधिक 10 वर्षांपर्यंत सूट देण्यात येईल, तर एक्स सर्विसमेन असणाऱ्या उमेदवारांना अधिक 3 वर्षांपर्यंत सूट देण्यात येईल.