फोटो सौजन्य - Social Media
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या गरजाही वाढत जात असतात. या गरजा पुरवण्यासाठी मोठ्या रक्कमेची गरज असते. परंतु, या वयामध्ये प्रत्येकाच्या खिशामध्ये मोठ्या नोटा असतीलच असे नाही. त्या गरजा पुरवण्यासाठी बहुतेक विद्यार्थी कष्ट घेत असतात. कामे करत असतात. या गरजा जास्तकरून शैक्षणिक असतात. अनेक मुले महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च स्वतः करण्याचा निर्धार करतात. तर बहुतांश मुले या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी घरच्यांना हातभार लावतात. तर अशा वेळी, अनेक मुले अशी असतात, ज्यांना स्वतःच्या शिक्षणाचा खर्च तसेच रोजच्या जीवनातील वस्तूसाठी खंबीर व्हायचे असते. परंतु, त्यांना कोणती कामे करावी याचा मुळीच अंदाज नसतो.
जर तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेत आहात आणि तुम्हाला स्वतःच्या शिक्षणाचा भार उचलण्यासाठी तसेच इतर गोष्टींसाठी पैशांची गरज आहे. तर नक्कीच तुम्ही अशा पर्यायांच्या शोधामध्ये आहात जेथून तुम्ही पार्ट टाइम जॉब करून बक्कळ पैसे कमवू शकता. तर तुम्हाला या लेखामधून अशा पार्ट टाइम जॉबच्या पर्यायांविषयी कळणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही महिन्याला ४० हजार ते ५० हजार आरामात महिना कमवू शकता. या रक्कमेने तुमचे शिक्षण तर होईलच त्याचबरोबर तुम्ही घराची जबाबदारीही झेलू शकता.
दिल्लीमध्ये एक व्यक्ती त्याच्या मित्राच्या घरी खासकरून शहर फिरण्यासाठी आला होता. या दरम्यान त्याने डिलिव्हरी बॉयचा जॉब करण्याचा निर्धार केला. या दरम्यान त्याने एका महिन्यामध्ये ४० हजार ते ५० हजार दरम्यान कमाई केल्याचे सांगितले आहे. हा व्यक्ती उत्तरप्रदेश येथील अमेठी शहरातील असून त्याचे नाव आमिर आहे. त्याच्या मते आताच्या काळात डिलिव्हरी बॉय उत्तम पर्याय आहे. याच्या माध्यमातून विद्यार्थी चांबगले कमावू शकतात.
हे देखील वाचा : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची उद्या शेवटची संधी, जाणून घ्या अर्जप्रक्रिया
आमिर सांगतो कि, जर विद्यार्थ्यांना फुल टाइम जॉब शोधणे कठीण जात असेल तर नक्कीच पार्ट टाइम जॉबचा विचार करावा. विद्यार्थी झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करून महिन्यामध्ये चांगली रक्कम गाठू शकता. यासाठी विद्यार्थ्यांनी झोमॅटो अँप डाउनलोड करून तेथे रजिस्टर करावे. नंतरच्या टप्प्यामध्ये आधार कार्ड आणि शाळेची सर्टिफिकेट मागितली जाईल त्याची पूर्तता करावी. आपण बाईक ने डिलिव्हरी करणार कि सायकलने? त्याचे उत्तर द्यावे. बाईक असल्यास आपल्या परवाण्याची पूर्तता करावी लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यावर उमेदवाराला किट आणि कपडे पुरवण्यात येतील याचे पैसे पहिल्या पगारातून कापले जातील.