फोटो सौजन्य- iStock
शासनाकडून विविध योजना राबविण्यात अनेकदा त्या लोकांपर्यंत योग्य कालावधीत पोहचत नाहीत. अनेकदा त्यांच्याबद्दल योग्य माहिती नसते अथवा अर्जप्रक्रिया नेमकी कळत येत नाही यासाठीच शासन योजनादूताद्वारे लोकांपर्यंत योजना पोहचवणार आहेत. शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख शुक्रवार दि. १३ सप्टेंबर २०२४ ही आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर जाऊन तात्काळ अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
तब्बल ५० हजार योजनादूतांची होणार निवड
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. या उपक्रमासाठी आतापर्यंत १ लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
उमेदवारासाठी पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया






