फोटो सौजन्य - Social Media
विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणावाचे प्रमाण इतक्या वाढले आहे की अनेक विद्यार्थी आत्महत्याच्या मार्गी जात आहेत. विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्याचे प्रमाण वाढत चालले आहे. कुटुंब तसेच शैक्षणिक संस्थांकडून मिळणारा हा तान विद्यार्थ्यांना झेपत नाही आहे. त्यामुळे कदाचित विद्यार्थी या मार्गाला जात आहेत. अमिर खानचा ‘3 इडियट’ चित्रपटात देखील हा मुद्दा दाखवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबद्दल अनेक मुद्दे बोलले जातात, जे अतिशय महत्त्वाचे देखील आहे. परंतु विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाबद्दल जास्त बोलले जात नाही, ज्यावर बोलणे अतिशय महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत शैक्षणिक संस्था या समस्येवर काय मदत करू शकतात? यावर विचार करणे आणि त्याचे समाधान शोधणे फार महत्त्वाचे आहे.
हे देखील वाचा : CA च्या परीक्षेची तयारी करताय? जाणून घ्या परीक्षेच्या तयारीसाठी काही टिप्स
प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. जिनी के गोपीनाथ यांच्या मते, “विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य सतत खालावत आहे. बहुतेक विद्यार्थी उच्च पातळीच्या ताणाखाली आहेत, ज्यामुळे त्यांच्या करिअरवर देखील वाईट परिणाम होत आहे. परिणामी, देशात आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. शैक्षणिक संस्थांनी त्वरित पाऊले उचलायला हवीत.”
शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्थांनी कशी मदत करावी?
जेव्हा विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर एका ठिकाणी येतो. त्यावेळी त्याला वेळोवेळी येणाऱ्या अनुभव हे नवीन असतात. त्या नव्या परिस्थितीला सामोरे जावे कसे याचे भान त्या विद्यार्थ्यांना नसते. नवीन मित्र, नवीन जागा, नवे वातावरण तसेच समस्या देखील नव्या. त्यामुळे अशा परिस्थितीत हा कोचिंग संस्थांनी विद्यार्थ्यांच्या मदतीला उभे राहिले पाहिजे. त्यांना समजून घेणे गरजेचे असते ते काम कोचिंग संस्थांनी केला पाहिजे. नवीन विद्यार्थ्यांना त्यांच्या काळजीसाठी उपलब्ध सेवा आणि संधींबद्दल ओरिएंटेशन दिले पाहिजे. संस्थांनी कोचिंगमधून कॅम्पसमध्ये संक्रमण, नवीन वातावरणात सामावून घेणे, सामाजिक आधार तयार करणे इत्यादी कौशल्यविकास कार्यशाळा आयोजित करायला हव्यात.
हे देखील वाचा : RBI मध्ये मेडिकल कन्सल्टंटच्या पदासाठी भरती प्रक्रिया; लवकर करा अर्ज
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून, विद्यार्थ्यांना वेलनेस आणि आव्हानांचा सामना करण्याच्या कौशल्यांचा अभ्यासक्रम शिकवल्याने त्यांचे लचीलापन वाढू शकते. या अभ्यासक्रमांचा विस्तार शिक्षकांपर्यंत केल्याने त्यांना विद्यार्थ्यांचा अनुभव अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि समर्थन देण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि व्यवस्थापनाला मानसिक आरोग्य संकटांना तोंड देण्यासाठी तयारी आणि प्रतिसादासाठी प्रशिक्षित करणे आवश्यक आहे, विशेषतः जेव्हा विद्यार्थी आत्महत्या, हिंसाचार किंवा इतर प्रवृत्ती दर्शवतात, ज्यांसाठी मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीची गरज भासू शकते. शैक्षणिक संस्थांनी मानसिक आरोग्यावर भर दिल्यास विद्यार्थ्यांना मानसिक ताणातून मुक्त होण्यास मदत होईल, यामुळे शिक्षणाचा अनुभव अधिक सकारात्मक होईल.