फोटो सौजन्य - Social Media
रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मेडिकल कन्सल्टंट च्या पदासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित केली गेली आहे. या रिक्त पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी एक बाब लक्षात ठेवावी की ही भरती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केली जात आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्या अगोदर उमेदवारांनी त्या जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्यावा.
हे देखील वाचा: NHB च्या ‘या’ भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत उद्यापर्यंत; लवकर करा अर्ज
या अधिसूचनेत या भरती संदर्भात महत्त्वाची आणि सखोल माहिती पुरवण्यात आली आहे, उमेदवारांना अर्ज करण्यास मदत करेल. रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या मेडिकल कन्सल्टंटच्या या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती अधिसूचनेत पुरवण्यात आले आहेत. या अटी शर्ती उमेदवारांच्या शिक्षणासंदर्भात आहेत. तसेच एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून एमबीबीएसची डिग्री प्राप्त केलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच जनरल मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेला उमेदवारांना या भरतीमध्ये अर्ज करण्यास मुभा देण्यात आली आहे.
फक्त डिग्रीच नव्हे तर अर्ज करता उमेदवाराकडे दोन वर्षांचा कामाचा अनुभव असणे अनिवार्य आहे तरच उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. रिझर्व बँकेच्या या भरती प्रक्रियेमध्ये निवड प्रक्रियेचा समावेश आहे. एकंदरीत, मुलाखतीच्या आधारावर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला प्रति तास 1000 रुपये वेतन दिले जाईल. अद्याप उमेदवारांचे वयोगट ठरवण्यात आलेले नाही. अटी शर्ती अधिक खोल स्वरूपात जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आधार घ्यावा. अर्जाचा फॉर्म भरून त्याची एखादी प्रत भविष्यासाठी स्वतःजवळ काढून ठेवावी.
हे देखील वाचा: स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम कामगिरीसाठी, ‘या’ टिप्सचे ठरतील प्रभावी
तसेच त्यातील एखादी प्रत आवश्यक त्या दस्तावेजांच्या सहित ‘क्षेत्रीय निदेशक, मानव संसाधन प्रबंधन विभाग, भरती अनुभाग, भारतीय रिझर्व बँक, पटना – 800001’ पत्त्यावर पाठवा. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घ्यावा आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करण्यात यावे.