फोटो सौजन्य - Social Media
भारतात वैद्यकीय क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी अनके जण प्रयत्नशील असतात. दरवर्षी अनेक जण बॅचलर ऑफ मेडिसीन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS) ची तयारी करत असतात. त्यासाठी नीटची परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते. यंदाच्या वर्षी एकूण २४ लाख विद्यार्थ्यांनी NEET EXAM २०२४ साठी अर्ज केले होते. त्यापैकी २३ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेस उपस्थिती लावली. विशेष म्हणजे २३ लाखांपैकी फक्त १३ लाख विद्यार्थ्यांनीच NEET EXAM 2024 यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आणि MBBS साठी प्रवेश घेण्यास पात्र ठरले. एकंदरीत, बॅचलर ऑफ मेडिसीन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS) साठी प्रवेश मिळवण्याकरीता NEET परीक्षेस पास करणे गरजेचे असते. या टप्प्यात अनेक जण काही गुणांनी मागे पडतात ज्यामुळे ते बॅचलर ऑफ मेडिसीन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS) मध्ये प्रवेश मिळकण्यात असमर्थ ठरतात.
महाराष्ट्र राज्यातील युवा कला तसेच क्रीडा क्षेत्रात जरी अग्रेसर असले तरी वैद्यकीय क्षेत्रात देखील भरारी घेताना दिसून येत आहेत. महाराष्ट्र सर्वात जास्त बॅचलर ऑफ मेडिसीन अँड बॅचलर ऑफ सर्जरी बॅचलर ऑफ मेडिसीन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS) साठी जागा असणाऱ्या भारतीय राज्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण १०,८४५ जागा MBBS साठी आहेत. त्याचबरोबर चौथ्या स्थानी उत्तरप्रदेश राज्याने क्रमांक लावला आहे. उत्तरप्रदेशमध्ये MBBS साठी ९,९०३ सीट्स आहेत. यांनतर यादीत पाचवा क्रमांक तेलंगणा राज्याचा आहे. या राज्यात MBBS साठी ८,४९० सीट्स आहेत. सहाव्या स्थानी गुजरात राज्याचा क्रमांक लागला आहे. येथील बॅचलर ऑफ मेडिसीन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS) मध्ये करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एकूण ७,१५० सीट्स आहेत. गुजरात नंतर आन्धप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश तसेच बिहारचा क्रमांक आहे.
हे सुद्धा वाचा : UGC परीक्षेच्या तारखेत बदल; गोकुळाष्टमीच्या निमित्ताने परीक्षा घेतली पुढे
देशात सगळ्यात जास्त डॉक्टर्स कर्नाटक राज्यात तयार होतात. भारतात सगळ्यात जास्त बॅचलर ऑफ मेडिसीन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS) साठी जागा असणाऱ्या राज्यांमध्ये कर्नाटक अव्वल स्थानी आहे. येथे बॅचलर ऑफ मेडिसीन अँड बॅचलर ऑफ सर्जरी (MBBS) पदासाठी एकूण ११,७४५ जागा आहेत. तर दुसऱ्या स्थानी तामिळनाडू आहे. येथे एकूण ११,६५० जागा MBBS साठी आहेत. एकंदरीत, दक्षिण भारतातील तरुण वैद्यकीय क्षेत्राकडे जास्त आकर्षित आहेत.