(फोटो सौजन्य - Social Media)
एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI)ने भरतीला सुरुवात केली आहे. या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारांना या अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे. Non-Executive पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या भरतीला ४ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात करण्यात आली आहे. तर उमेदवारांना ५ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना नियुक्तीसाठी परीक्षेस उत्तीर्ण राहावे लागणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी AAIच्या aai.aero या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
काही ठराविक आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. मुळात, सामान्य तसेच OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी १००० रुपये अर्ज शुल्क करायचे आहे. EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अर्ज शुल्क म्हणून १००० रुपये भरायचे आहे. तर SC तसेच ST प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच PWD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनाही निशुल्क अर्ज करायचे आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर अर्ज करण्याअगोदर जाहीर अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा आणि सर्व पात्रता निकषांना वाचून त्याची पूर्तता करा.
मुळात, हे पात्रता निकष शैक्षणिक आहेत आणि उमेदवारांच्या वयोमर्यादे संदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भर्तीसाठी अर्ज करता येणार आहे. तर जास्तीत जास्त ३० वर्षे आयु या भरतीसाठी निश्चित करण्यात आली आहे. Senior Assistant पदासाठी एकूण ४ जागा रिक्त आहेत. तसेच अर्ज करता उमेदवार इंग्रजी भाषेतून पदवीधर हवा. Senior Assistant पदासाठी २१ जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करता उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे तसेच त्यांच्याकडे २ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे. इलेक्ट्रॉनिक्स विभागात Senior Assistant पदासाठी अर्ज करता उमेदवार डिप्लोमाधारक असावा तसेच त्याच्याकडे किमान २ वर्षांचे अनुभव असणे आवश्यक आहे. फायर विभागात ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करता उमेदवार 12th पास उमेदवार अर्ज करू शकतो.
उमेदवारांच्या नियुक्तीसाठी निवड प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. उमेदवारांना लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. त्यांच्या कौशल्याची चाचणी घेण्यात येईल. तसेच उमेदवारांना ड्राइविंग टेस्ट उत्तीर्ण करावे लागेल. दस्तऐवजांची पडताळणी तसेच वैद्यकीय चाचणी या टप्प्यांना पात्र करावे लागणार आहे.