
फोटो सौजन्य - Social Media
बँक ऑफ इंडिया (BOI)ने ११५ रिक्त जागांसाठी भरतीला सुरुवात केली आहे. मॅनेजर पदासाठी भरती आयोजिली आहे. निवड प्रक्रियेत दोन टप्प्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ऑनलाईन परीक्षा तर दुसऱ्या टप्प्यात मुलाखत घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा १२५ मार्कांची असून परीक्षा सोडवण्यासाठी एकूण १०० मिनिटांचा वेळ देण्यात येईल. उमेदवारांची निवड हे टप्पे तर अनुभवावूनही घेण्यात येणार आहे.
अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना SC / ST / PWD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना १७५ रुपये भरावे लागणार आहे. तर General / OBC / इतर प्रवर्गांसाठी अर्ज शुल्काची रक्कम ८५० रुपये ठरवण्यात आली आहे.
वयोमर्यादा काय आहे? शैक्षणिक पात्रता काय आहे? या संबंधित असणारे सर्व माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. या संबंधित अधिक माहिती अभ्यासण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. ही अधिकृत अधिसूचना बँक ऑफ इंडियाने त्यांच्या https://bankofindia.bank.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली आहे.
अशा प्रकारे करता येईल अर्ज