फोटो सौजन्य - Social media
घरामध्ये बसून चांगल्या रक्कमेमध्ये कमवणे प्रत्येकाची इच्छा असते. परंतु, प्रत्येकाला असा ऐशो आरामात असणारी नोकरी मिळणे कठीण असते. पण आता भार घेण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या चांगली रक्कम कमवू शकता. खासकरून महिला वर्गासाठी या भरती प्रकियेस सुरुवात करण्यात आली आहे. आता घरातील कामासहित अनेक महिला स्वावलंबी बनू शकतात. ऑफिसचे काम तसेच घरातील कामे अशा कामांनी त्रासलेल्या महिलांसाठी ही उत्तम संधी आहे. एकूण ६७५ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : इंजिनिअरिंग केलंय पण मिळत नाहीये काम; ‘या’ कोर्सपासून मिळवाल नोकरी, कमवाल लाखोंचा दाम
इच्छुक उमेदवारांना ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. ही भरती प्रक्रिया श्री मोहन टेक्सटाइल कंपनीद्वारे आयोजित केली गेली आहे. महत्वाची बाब अशी आहे कि राजस्थानमध्ये राहणाऱ्या महिलांना या योजनेचा पुरेपूर लाभ घेता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करताना महिलांना काही अटी शर्तींची पूर्तता असणे गरजेचे आहे. विशेष गोष्ट अशी आहे कि यामध्ये शैक्षणिक तसेच वयोमर्यादेसंबंधित अटी शर्ती नाही आहेत. कोणत्याही वयातील महिला तसेच कोणतेही शिक्षण घेतलेली महिला या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये सहभाग घेण्यासाठी एखादे ठराविक वय असणे किंवा ठराविक शिक्षण घेणे अनिवार्य नाही आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे कि अर्ज करणारी महिला शिलाईमध्ये तरबेज असावी.
जर तुम्हालाही या घरबसल्या कमवण्याच्या संधीचा लाभ घ्यायचा असेल तर राजस्थान सरकारच्या वर्क फ्रॉम होम वेब पोर्टलला भेट द्या. येथे तुम्ही तुमच्या अर्ज प्रक्रियेस पूर्णत्वास आणू शकतात. जरी सरकारी पोर्टलवर जाऊन अर्ज करावयाचे असले तरी ही नोकरी खाजगी स्वरूपाची आहे. या भरती संबंधित महत्वाची बाब अशी आहे कि कोणत्याही शिक्षणाशिवाय कोणतीही महिला या भरतीच्या प्रक्रियेत भाग घेऊ शकते आणि नियुक्तीसाठी अर्ज करू शकते. परंतु शिवण कामासंबंधित असलेले ज्ञान अतिशय महत्वाचे आहे आणि अनिवार्य आहे.