फोटो सौजन्य - Social Media
अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये जाण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. लहानपणी जवळजवळ सगळेच या क्षेत्रामध्ये जाण्याचे स्वप्न बघत असतात. मी मोठे होऊन अभियंता बनेल. असे बहुतेक जण कधी ना कधी त्यांच्या लहानपणी बोललेच असेल. देशामध्ये लहानग्यांना लहानपणी डॉक्टर इंजिनिअर बनण्याचे धडे शिकवले जातात. मुळामध्ये, यात काही चुकीचे नाही. परंतु, लहान मुलांना करिअरसाठी इतर क्षेत्रही अस्तित्वात असतात याच्या ज्ञानापासून एकप्रकारे वंचित ठेवले जाते. मुळात, समज येताच मुलांना इतर क्षेत्राबद्दलही ज्ञान येते. इंजिनीअरिंग झालेली बहुतेक उमेदवार सध्या रोजगाराच्या तीव्र शोधात आहेत. यातील अनेक जण शोध घेऊन दमले आहेत. एकंदरीत, अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये नवनिर्वाचित अभियंत्याला अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये स्थान मिळवणे कठीण झाले आहे. अशामध्ये स्पर्ध्येला वाढ होत आहे. स्पर्ध्येच्या या जगामध्ये काहीतरी वेगळे कौशल्य असणे फार आवश्यक आहे. ते आत्मसात करण्यासाठी अनेक कोर्स उपल्बध आहेत, ज्याच्या साहाय्याने कौशल्यप्राप्त करणे सोपे होते.
हे देखील वाचा : फक्त तीन महिन्यात शिका परदेशी भाषा; मिळेल उत्तम संधी, कमवाल मोठ्या रकमेत
संशोधन करून डेटा गोळा करणे, त्याचा अभ्यास करून ते व्यवस्थित रित्या एकत्र करणे. तसेच गोळा केलेल्या माहितीचे समीक्षण करणे. अशी कामे या कोर्सच्या माध्यमातून शिकवले जातात. यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेले उमेदवार डेटा एनालिटिक्स तसेच बिजनेस एनालिटिक्स म्हणून कार्य करू शकतात.
वेब डेव्हलोपमेंट कोर्सच्या साहाय्याने वेबसाईट बनवणे तसेच त्यांच्या वापरास चालना देणे सारखे ज्ञान शिकवले जाते. HTML, CSS, आणि JavaScript सारख्या तंत्रज्ञानाचे ज्ञान दिले जाते. या कोर्सच्या माध्यमातून चांगल्या कंपन्यांमध्ये उच्च पगाराची नोकरी मिळवता येते.
उच्च वेतन वाल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या तंत्रज्ञान विभागातील तरुणांनी सायबर सिक्योरिटीचा शॉर्ट टर्म कोर्स नक्की करावा. याला अभ्यासून आपण आपले तसेच आपल्या कंपनीचे डेटा सुरक्षित ठेवू शकता. अनेक मोठ्या कंपन्यांना सायबर सिक्योरिटीची गरज भासते.
हे देखील वाचा : आपण कशा ऑफिसमध्ये काम करत आहात? टॉक्सिक कि चांगले? जाणून घ्या
हा कोर्स उमेदवाराला प्रोजेक्टला सफलतापूर्वक प्रबंधित करायला शिकवते. याच्या शिक्षणानंतर उमेदवाराला प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करता येते.
तंत्रज्ञान क्षेत्रातील उमेदवारांकडे हे कौशल्य असल्यास त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये आणखीन उच्चतम सीमा गाठण्यात मदत होते. तसेच त्यांच्या स्वप्नांना अधिक गती देण्यास मदत होते.