फोटो सौजन्य - Social Media
जगामध्ये विविध पिढ्या आढळून येतात. त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. यातील १९९५ आणि २०१० दरम्यान जन्माला आलेली पिढी म्हणजे Gen Z. सध्या युवा वर्गामध्ये या काळाचे राज्य आहे. असे म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही. या पिढीतील तरुणांच्या खांद्यावर जबाबदार्या पडण्यास सुरुवात झाली आहे. यातील ९० दशकाच्या उत्तरार्धात जन्माला आलेल्या काही तरुणांचे लग्न झाले आहे तर काही २०००’s च्या दशकच्या उत्तरार्धात असणारे बालमंडळी सध्या शाळेच्या दारातून बाहेर पडत दुनियादारीच्या क्षेत्रात त्यांचे पहिले पाऊल टाकत आहेत. या Gen Z बद्दल एक सर्वे घेण्यात आलेला आहे. या सर्वेमध्ये खाजगी नोकरीच्या संदर्भात काय मत आहेत? या बद्दल माहिती मिळवण्यात आली आहे. या अहवालाला तयार करताना, अनेक पैलू विचारात ठेवले गेले आहेत. यामध्ये Gen Z संबंधित अनेक बाबी मांडल्या गेल्या आहेत. यात Gen Z चे नोकऱ्या बदलण्याची कारणे, नोकरी क्षेत्रामध्ये प्रवेश करताना त्यांच्या मनामध्ये असणारी मोठी चिंता, मानसिक आरोग्य तसेच त्यांना असणाऱ्या अपेक्षा इत्यादी विविध घटकांचा समावेश आहे.
हे देखील वाचा : सरकारी क्षेत्रामध्ये काम करायचे आहे? आजच ‘या’ ५ व्हॅकन्सीजचा लवकर विचार करा, मुदत संपत आलीये
Gen Z at Workplace ने हा अहवाल सादर केला आहे. या अहवालात सांगितले गेले आहे कि Gen Z पिढीतील ४५% तरुण २ वर्षेही नोकरीच्या एका जागी टिकत नाहीत. याला विविध कारणेदेखील आहेत. मुळात, प्रत्येकाची वेगवेगळी कारणे आहेत. तर ५१ टक्के लोकांना नोकरी गमावण्याची भीती आहे. ही चिंता त्यांच्या करिअरच्या संभाव्यतेपर्यंत विस्तारित आहे कारण 40 टक्के लोकांना नोकरी मिळाल्यानंतरही त्यांच्या पसंतीच्या क्षेत्रात पद कायम ठेवण्याची चिंता आहे.
अहवालामध्ये आणखीन काही बाबी मांडण्यात आल्या आहेत. अहवालामध्ये असणाऱ्या ७७% तरुणांनी कमर्शिअल ब्रँड तसेच त्यांच्या पदाला किमंत जास्त दिली आहे. तर या ७७% तरुणांमधील ४३% तरुण अनुभव तसेच वाढीच्या संधीला जास्त महत्व देत असतात. अहवालाट सादर असलेल्या तरुणांपैकी ७२% तरुण वेतनाच्या रक्कमेपेक्षा जॉब सेटिस्फेक्शन ला जास्त महत्व देतात. तर ७८% तरुण नोकरी बदलत आहेत कारण त्यांना आणखीन पुढे जायचे आहे. HR प्रोफेशनल मधील ७१% तरुणांचे असे सांगणे आहे कि नोकरी बदलण्याचे प्रमुख कारण वेतन आहे. त्यामुळे तरुणाईतील २५% संख्या नोकरी बदलताना विशेष लक्ष पगारावर देतात.
हे देखील वाचा : भारतीय रेल्वेमध्ये भरतीला सुरुवात; १० वी उत्तीर्ण उमेदवारही करू शकतात अर्ज
इंटरनेटवरून मिळालेल्या माहितीनुसार, जनरेशन झेड म्हणजे 1995 च्या मध्यापासून 2010 च्या मध्यापर्यंत जन्मलेले लोक. अशा लोकांना स्वतःमध्ये राहायला जास्त आवडते. तसेच जनरेशन Z ही इंटरनेट जगताशी खूप परिचित पिढी आहे. इंटरनेटला ओळखून असणारी पहिली पिढी असे या पिढीला संबोधले तरी काही गैर नाही. या पिढीला ‘डिजिटल नेटिव्ह’ असेही म्हणतात.