घरच्यांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कन्फर्म रेल्वे तिकीट पाहिजे? 'या' टीप्स फॉलो करा (फोटो सौजन्य - pinterest)
भारतीय रेल्वेमध्ये पुन्हा एकदा भरतीला सुरुवात झाली आहे. या भरतीमध्ये विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. नुकतेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाने NTPC म्हणजे नॉन टेक्निकल पदासाठी भरतीला सुरुवात केली होती. या भरतीमध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या संख्येत चांगलीच वाढ दिसत आहे. इतक्यात, भारतीय रेल्वेमध्ये दुसऱ्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल नॉर्थ सेंट्रल रेल्वेमध्ये या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेत १६०० हुन अधिक पदांचा विचार केला जाणार आहे. विविध पदांसाठी उमेदवारणाची निवड केली जाणार आहे. या भरती संदर्भात RRC ने अधिकृत अडझीसुचना जाहीर केली आहे. १६ सप्टेंबर २०२४ पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या मुभेस सुरुवात होणार आहे. तर उमेदवारांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.
हे देखील वाचा : सरकारी नोकरी: भारत सरकारच्या IWAI कंपनीमध्ये 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी !
RRC ने आयोजित केलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण १६७९ उमेदवारांची भरती केली जाणार आहे. ही भरती उत्तर मध्ये रेल्वेची असल्यामुळे या भरती प्रतीक्रीयेमध्ये उमेदवारांना उत्तर प्रदेश राज्यतील विविध क्षेत्रामध्ये काम करता येणार आहे. या भरतीमध्ये प्रयागराज डिवीजन (मेक. विभाग)च्या ३६४ जागा, प्रयागराज (टेक.विभाग)च्या ३३९ जागा, झांसी डिवीजनच्या ४९७ जागा, वर्कशॉप झांसीच्या १८३ जागा तसेच आगरा डिवीजनच्या २९६ जागांचा समावेश आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये वेल्डर, फिटर, इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, पेंटर, स्टेनोग्राफर/इंग्लिश, वायरमन, मॅकेनिस्ट आणि टर्नर फ्लॉईड या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. या संदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा, जेणेकरून या भरतीसंबंधित सखोल माहिती मिळवता येईल. या अधिसूचनांमध्ये काही अटी शर्ती देण्यात आल्या आहेत, उमेदवारांना अर्ज करण्यासाठी या अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या अटी शर्ती शैक्षणिक तसेच वयोमर्यादे संदर्भात आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र उमेदवारांचे वय किमान १५ वर्षे तर जास्तीत जास्त २४ वर्षे असणे अनिवार्य आहे. उमेदवार SSC उत्तीर्ण असून किमान ५०% गुण मिळालेले हवे. उमेदवारांची नियुक्ती पूर्णपणे मेरिटवर आधारित आहे.
हे देखील वाचा : कोकण रेल्वेमध्ये 190 जागांसाठी भरती; महाराष्ट्रातील उमेदवारांना प्राधान्य, आजपासून करता येणार अर्ज
अर्ज करण्यास पात्र उमेदवारांनी actappt.rrcrail.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज नोंदवावे तसेच अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचनेचा अभ्यास करावा. SC /ST आणि महिला प्रवर्गातील उमेदवार या अर्ज प्रक्रियेत निशुल्क सहभाग घेऊ शकतात, तर इतर उमेदवारांना १०० रुपये अर्जशुल्क भरावे लागणार आहे.