फोटो सौजन्य - Social media
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन (ISRO)ने विविध पदांसाठी भरती प्रक्रियेस सुरुवात केली आहे. संस्थेमार्फत उमेदवारांना विविध पदांसाठी निवडले जाणार आहे. या संबंधित अधिकृत अधिसूचना ISRO ने जाहीर केले आहे. अनेक उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज करण्यास सुरुवातही केली आहे. विशेष म्हणजे ISRO मध्ये काम करण्याची इच्छा आहे पण कमी शिक्षण स्वप्नांच्या आड येत आहे, अशा उमेदवारांसाठी ISROची ही संधी खूप महत्वाची आहे. या संधीचे सोने करण्यास अनेक उमेदवार इच्छुक आहेत. जर तुम्हीही या संधीचे सोने करू इच्छित तर अर्जप्रक्रियेत सहभागी होणे भाग आहे. इसरोच्या या भरतीप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अर्ज करावे लागणार आहे. महत्वाचे म्हणेज ही अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी इसरोच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. www.isro.gov.in येथे अर्ज तर भारत येणारच आहे, त्यासह या भरतीसंबंधित इतर महत्वाची माहितीही वाचायला मिळणार आहे.
हे देखील वाचा : Career Tips: ‘या’ सॉफ्ट स्किल्स करिअरमधील प्रगतीसह व्यक्तीमत्वाचाही होतो विकास!
उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत १० सप्टेंबर, २०२४ तारखेपर्यंत आहे. यानंतर फॉर्म स्वीकारले जाणार नसल्याने ISRO ने उमेदवारांना लवकर अर्ज कर्णयचे निर्देश दिले आहेत. या भरती प्रक्रियर्त इसरो संस्थेतील विविध पदांसाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. या पदांमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, वेल्डर, टर्नर, मेकॅनिक, फिटर, मशीनिस्ट, ड्रायव्हर तसेच इतर पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे. या भरती प्रक्रियेत इसरो संस्थेतील ११ टेक्निकल असिस्टंस पदाच्या ११ रिक्त जागांचा, ११ टेक्निशिअन ‘बी’ पदाच्या ११ रिक्त जागांचा तसेच जड वाहन चालक A लेव्हल २ साठी ५ तर जड वाहन चालक A च्या एकूण २ शिल्लक जागांचा विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर कुकच्या १ रिक्त जागेसाठीही भरती केली जाणार आहे. विशेष म्हणजे कुक पदी निवड झालेल्या उमेदवारास 19,900-63,200/- दरम्यान दरमाह वेतन दिला जाईल.
हे देखील वाचा : DMRC मध्ये इलेक्ट्रिकल विभागात भरती सुरु; लाखोंच्या घरात मिळणार पॅकेज
या भरती प्रक्रियेत सहभाग घेऊ इच्छुक असणाऱ्या उमेदवाराचे वय १८ वर्षे ते ३५ वर्षांदरम्यान असावे. वयोमर्यादेत SC तसेच SC प्रवर्गातील उमेदवारांना अधिक ५ तर OBC प्रवगातील उमेदवारांना अधिक ३ वर्षांपर्यंतची सूट दिली जाणार आहे. उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थानातून मॅकेनिकल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा/SSLC/SSC उत्तीर्ण हवा. त्याचबरोबर उमेदवाराने ITI/NTC/NAC/10वी पास केलेली हवी. चालक पदासाठी उमेदवारकडे लायसेस तसेच अनुभव असणे गरजेचेच असणार आहे. हलक्या वाहनासाठी ३ वर्षाचा किंवा जड वाहनासाठी ५ वर्षांचा अनुभव उमेदवाराकडे असणे गरजचे असणार आहे.