
फोटो सौजन्य - Social Media
गिटारमध्ये करिअर घडवण्यासाठी सर्वप्रथम बेसिक ट्रेनिंग घेणे आवश्यक असते. यासाठी तुम्ही संगीत महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकता किंवा ऑनलाइन कोर्सेसद्वारे प्रशिक्षण घेऊ शकता. संगीत सिद्धांत (Music Theory), स्केल्स, कॉर्ड्स, फिंगर टेक्निक्स आणि स्टेज परफॉर्मन्स यांचे ज्ञान मिळवणे गरजेचे असते. एकदा तुम्ही बेसिकमध्ये पारंगत झालात की पुढे Acoustic, Electric आणि Bass Guitar या शाखांमध्ये स्पेशलायझेशन करू शकता.
गिटारिस्ट म्हणून करिअर घडवण्यासाठी अनेक क्षेत्रे खुली आहेत जसे की संगीत बँडमध्ये वादन, फिल्म इंडस्ट्रीत बॅकग्राऊंड स्कोर देणे, स्टुडिओ रेकॉर्डिंग, म्युझिक टीचर म्हणून काम करणे, किंवा यूट्यूब आणि सोशल मीडियावर स्वतःचा चॅनल तयार करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे. आज अनेक स्वतंत्र कलाकार (Independent Artists) त्यांच्या गिटार कव्हर्स आणि ओरिजिनल म्युझिकमुळे लोकप्रिय झाले आहेत.
प्रारंभी गिटारिस्टला दर परफॉर्मन्ससाठी ₹५,००० ते ₹१०,००० मिळतात, तर अनुभवी कलाकारांना स्टुडिओ अल्बम्स, टूर आणि ब्रँड कोलॅबोरेशन्सद्वारे महिन्याला ₹५०,००० ते ₹१ लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते.गिटार ही केवळ एक कला नसून ती एक करिअर बनवण्याची संधी आहे. मनापासून सराव, संयम आणि सातत्य ठेवल्यास तुमच्या तारांमधून उमटणारे सूर एके दिवशी यशाची गाणी गातील आणि ही गाणी येत्या पिढीला वेड लावतील.