फोटो सौजन्य - Social Media
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)ने प्रवेश पत्र जाहीर केले आहे. या भरतीमध्ये अर्ज करण्याऱ्या उमेदवारांना लवकरच अर्ज करता येणार आहे. ज्युनिअर एकजिक्यूटिव्हच्या पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. २३४ रिक्त जागांना भरण्यासाठी अर्ज करता येणार आहे. अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहे. लवकरच, या भरतीच्या संदर्भात उमेदवारांना परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. १५ जानेवारी २०२५ रोजी या भरतीला सुरुवात करण्यात आली होती. १४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता आले होते. मोठ्या संख्येने उमेदवार या प्रक्रियेत भरती झाले होते. अर्ज ऑनलाईन स्वरूपात ठेवण्यात आले होते. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना hindustanpetroleum.com या संकेतस्थळाला भेट द्यावी लागली होती.
२७ मार्च रोजी परीक्षा आयोजित करण्यात आली असून उमेदवारांना या परीक्षेला उपस्थित राहावे लागणार आहे. जनरल, OBC तसेच EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्ह्णून 1180/- इतकी रक्कम भरायची आहे. ST तसेच SC या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून निशुल्क अर्ज करता येणार आहे. तसेच PWD या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अर्ज शुल्क माफ आहे. उमेदवारांना अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे निश्चित करण्यात आले होते. या परीक्षेसंबंधित प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले असून, उमेदवारांना याचा आढावा घेता येणार आहे. तसेच ते डाउनलोड करता आणि पाहता येणार आहे.
उमेदवारांना अर्ज करण्यासाठी काही पात्रता निकष निश्चित करण्यात आले होते. हे निकष उमेदवारांच्या वयोमर्यादेच्या संदर्भात आहेत. तसेच शिक्षणासंदर्भात आहेत. किमान १८ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २५ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या शैक्षणिक अटीनुसार, संबंधित क्षेत्रात उमेदवार डिप्लोमाधारक असावा. विविध टप्य्यांमध्ये उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांना कॉम्प्युटर बेस्ड लेखी परीक्षा पार करावी लागणार आहे.
ग्रुप डिस्कशनमध्ये उमेदवारांना सहभागी व्हावे लागणार आहे. उमेदवारांच्या कौशल्यांची चाचणी करण्यात येणार आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे, तसेच दस्तऐवजांची पडताळणीसाठी यावे लागणार आहे. वैद्यकीय चाचणीसह उमेदवारांना सर्व टप्प्यांना पात्र करत या नियुक्तीस पात्र होता येणार आहे.