अनुराग कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा अनेक तरुणांसाठी मार्गदर्शक ठरू शकते. कॉलेजमध्ये शिकताना एका वर्षी त्यांना बॅक लागली होती. अशा वेळी अनेक जण निराश होतात, पण अनुराग यांनी हार मानली नाही. त्यांनी मेहनतीने आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2017 मध्ये त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा पास केली, मात्र मिळालेली रँक त्यांना समाधानकारक वाटली नाही. म्हणूनच त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षेला बसायचं ठरवलं आणि 2018 मध्ये त्यांनी 48वी रँक मिळवून आपलं स्वप्न पूर्ण केलं.
1000 पदांसाठी जागा रिक्त! ICF मध्ये भरती प्रक्रियेला सुरुवात
फक्त करिअरमध्येच नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल झाले. त्यांनी UPSC टॉपर अनन्या सिंहशी विवाह केला. अनन्या स्वतःही अतिशय कमी वयात UPSC परीक्षा पास करणाऱ्या टॉपरपैकी एक आहे. त्यांचं नातं केवळ प्रेमाचं नाही, तर एकमेकांच्या यशात साथ देणारं आहे. दोघांची जिद्द, समर्पण आणि मेहनत आजच्या पिढीला खूप काही शिकवून जाते.
अनुराग कुमार यांचा प्रवास हे दाखवतो की अपयश आले तरी प्रयत्न थांबवू नयेत. सातत्य, संयम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही परीक्षा, कितीही मोठं स्वप्न सहज शक्य होतं. त्यांच्याकडून शिकण्यासारखं म्हणजे, हार मानणं हे यशाचा पर्याय नाही. मेहनत सुरू ठेवा, यश नक्कीच मिळेल.