फोटो सौजन्य - Social Media
इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (ICAI)ने CA इंटर तसेच फाउंडेशनचा निकाल जाहीर केला आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. या परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी icai.org किंवा icaiexam.icai.org या अधिकृत संकेस्थळाला भेट द्यावी. एकंदरीत, येथेच उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ३० ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार होता.
हे देखील वाचा : पर्यटन विभागामध्ये सुपर व्हॅकन्सी; अधिसूचना जाहीर, ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज
अशा प्रकारे CA च्या परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे:
CA फाउंडेशनच्या परीक्षेमध्ये ४ प्रश्नपत्रिका समाविष्ट होत्या. पेपर १ हा लेखांकनाच्या संबंधित होता. यामध्ये लेखांकनाची तत्त्वे आणि सराव समाविष्ट आहेत. पेपर २ मध्ये व्यवसाय कायदा तसेच व्यावसायिक पत्रव्यवहार याचा समावेश होता. प्रोफेशनल मॅथेमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग आणि स्टॅटिस्टिक्स या विषयांचा समावेश पेपर ३ मध्ये करण्यात आला आहे. तर पेपर ४ मध्ये व्यवसाय अर्थशास्त्र आणि व्यवसाय आणि व्यावसायिक ज्ञान या विषयांधसंबंधित प्रश्न विचारले गेले होते. सप्टेंबर महिन्यामध्ये फाऊंडेशन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. १३ सप्टेंबर २०२४ रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. तर १५ सप्टेंबर, १८ सप्टेंबर आणि २० सप्टेंबर रोजी या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. CA ग्रुप १ साठी आयोजित intermediate exams १२ सप्टेंबर, १४ सप्टेंबर आणि १७ सप्टेंबर रोजी घेतली गेली. तर ग्रुप २ साठी परीक्षा १९ सप्टेंबर, २१ सप्टेंबर आणि २३ सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती.
हे देखील वाचा : UPSC च्या परीक्षेत निबंध लिहण्याचे टिप्स; अनुसरण करा, मिळवा चांगले गुण
यंदाच्या CA च्या परीक्षेसाठी एकूम ७०,४३७ विद्यार्थी उपस्थित राहिले होते. परंतु, यातील काहीच संख्या या कठीण मानल्या जाणाऱ्या परीक्षेला उत्तीर्ण करू शकले. या संख्येतील केवळ १३,८५८ संख्या या परीक्षेला उत्तीर्ण करू शकले. फक्त १९.६७% उमेदवार या परीक्षेला उत्तीर्ण करू शकले आहेत. गेल्या वर्षी एकूण ४९,५८० पुरुष विद्यार्थी परीक्षेत समाविष्ट झाले होते. या संख्येतील केवळ १५.६६% उमेदवारांनीच ही परीक्षा उत्तीर्ण केली होती.