फोटो सौजन्य : Social Media
ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) ने वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या भरती प्रक्रियेत उमेदवाराला सरकारी क्षेत्रात सिनियर मेडिकल ऑफिसरची भूमिका बजावत येणार आहे. महत्वाचे म्हणजे ही भरती प्रक्रिया AIIMS रायपूर येथे सिनियर मेडिकल ऑफिसर (ग्रुप A) च्या पदांसाठी निघाली आहे. या भर्तरी प्रक्रियेतून उमेदवाराला सिनियर मेडिकल ऑफिसर पदी नियुक्त केले जाईल. विशेष म्हणजे सिनियर मेडिकल ऑफिसर पदाच्या रिक्त जागांसाठी घेण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक उमेदवारांना २३ ऑगस्ट, २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्यात यावे असे निर्देश AIIMS ने जाहीर केले आहेत.
सिनियर मेडिकल ऑफिसरच्या रिक्त जागांसाठी घेण्यात येत असलेल्या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करता येणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी AIIMS रायपूरच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावे. www.aiimsraipur.edu.in हे AIIMS रायपूरचे अधिकृत संकेतस्थळ आहे. या भरती प्रक्रियेतून विविध विभागातील सिनियर मेडिकल ऑफिसर पदाचे एकूण ८२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. शिल्लक जागांमधील १७ जागा जनरल प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहे. २९ OBC उमेदवारांसाठी तर २२ जागा SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. ८ जागा ST प्रवगातील उमेदवारांसाठी तर ६ जागा EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत.
AIIMS रायपूरमधील सिनिअर मेडिकल ऑफिसरच्या रिक्त जागांसाठी आयोजित असणाऱ्या या भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून १००० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारास लेव्हल ११ च्या अनुसार ६७,७०० दरमाह वेतन दिले जाईल. मुळात, निवड प्रक्रियेत उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखतीच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाईल. मुलाखती दरम्यान उमेदवाराकडे पदवीधर असल्याचे प्रमाणपत्र, मार्कशीट तसेच जातीचा दाखला असणे गरजेचे असणार आहे.
भरती प्रक्रियेत उमेदवार ‘या’ बाबींमध्ये पात्र असणे गरजेचे आहे