फोटो सौजन्य- iStock
पुण्यातील अर्नस्ट एंड यंग इंडिया मध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय कर्मचारी अॅना सेबॅस्टियनचे ओवरवर्क प्रेशर मुळे मृत्यू झाला. कामाच्या तासांबाबत आणि कार्यसंस्कृतीबद्दल देशभरात सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. भारतातील काम करण्याची स्थिती ही कर्मचाऱ्यांसाठी अनुकूल दिसत नाही आहे. कंपन्यां कर्मचाऱ्यांचा जास्त वापर करुन घेत आहेत. जास्त काम करुन घेण्यात भारतीय कंपन्या या जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या कार्यशैलीवरच इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशन (ILO) ने अहवाल जारी केला आहे.
भारतामध्ये 51 टक्के कर्मचारी आठवड्याचे 49 तासाहून अधिक काम करतात
या अहवालानुसार भारतामध्ये 51 टक्के कर्मचारी आठवड्याचे 49 तासाहून अधिक काम करतात. केवळ भूतान देशच भारतापेक्षा कामाच्या तासांबाबत पुढे आहे. भूतानमध्ये 61 टक्के कर्मचारी आठवड्यातून 49 तासांपेक्षा जास्त काम करतात. लोकसंख्येनुसार विचार केल्यास भारतातील कर्मचाऱ्यांचा आकडा हा भूतान आणि अन्य देशांपेक्षा कैकपटीने जास्त आहे.
आयएलओ (International Labour Organization)च्या अहवालानुसार, भारतातील प्रत्येक कर्मचारी आठवड्यातून 46.7 तास काम करतात. भारतासह दक्षिण आशियातील अनेक देशांमध्ये अशाप्रकारेच कर्मचाऱ्यांना राबविण्यात येते. त्यामुळे कर्मचारी ही कामासंबंधी आनंदी नसतात हे अनेक अहवालातून सिद्ध झाले आहे. विकसित भारत बनविण्याचा संकल्प असलेल्या देशात कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या ताणावर लक्ष दिले पाहिजे. कारण विकसित देशामध्ये कामाचे तास हे भारताच्या तुलनेत खुपच कमी आहेत. त्यामुळे ते वर्क लाईफ बॅलेंन्स साधू शकतात.
या देशांमध्ये आहेत कामाचे कमी तास, दिले जाते वर्क लाईफ बॅलेन्सला महत्व
नेदरलॅंड आणि नोर्वे देशामध्ये कर्मचाऱ्यांची खास काळजी घेतली जाते. या देशामध्ये वर्क लाईफ बॅलेन्सला खूप महत्वही दिले जाते. नेदरलॅंडमध्ये कर्मचारी हे आठवड्यातील केवळ 31.6 तास काम करतात. नोर्वेत 33.7 तास काम केले जाते. जर्मनीमध्ये 34.2 तास काम केले जाते, युके मध्ये 35.9 तास तर अधिक कार्यशील असणारा देश म्हणून ओळख असणाऱ्या जपानमध्ये 36.2 तास काम केले जाते. जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिकेत 38 तास काम केले जाते. ब्राझील, इटली, फ्रांन्स या देशातही कामाचे कमी तास आहेत. एवढंच काय तर चीनमध्येही भारतापेक्षा कमी कामाचे तास आहेत. त्यामुळे भारतातील वर्क कल्चर आणि कर्मचाऱ्यांकडून ओवरटाईम करुन घेण्याची वृत्ती ही येथे दिसून येते.
भारतातील उद्योगपतीचा कामाच्या तासांबद्दल संतापजनक वक्तव्य
गेल्यावर्षीच इन्फोसिस या नामांकित आयटी कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांनी 70 तास काम केले पाहिजे असे अजब वादग्रस्त विधान केले होते त्यावर ओला कंपनीचे मालक भाविश अग्रवाल यांनी समर्थन दिले आणि वर म्हटले की वर्क लाईफ बॅलेन्स या संकल्पनेच्याच मी विरोधात आहे. या दोघाना ट्रोल केले गेले होतेच शिवाय कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणारी मनोवृत्ती असल्याची टीका सोशल मीडीयावर केली गेली होती.