
फोटो सौजन्य - Social Media
२४ सप्टेंबर तसेच २७ सप्टेंबर रोजी परीक्षेचा पहिला टप्पा आयोजित करण्यात आला होता. या टप्प्यात एकूण ६,२८,९५७ विद्यार्थी उपस्थित राहिले होते. तर अतिवृष्टीमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. म्हणून दुसऱ्या टप्प्याचे आयोजन १८–२१ नोव्हेंबर रोजी करण्यात आले आणि या परीक्षेत ९०,७६५ विद्यार्थी बसले होते. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणात कलेला मिळालेल्या प्रोत्साहनामुळे आणि शाळांमधील डिजिटल सुविधांमुळे विद्यार्थ्यांचा सहभाग वाढल्याचे कला संचालक डॉ. किशोर इंगळे यांनी सांगितले.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुढच्या वर्षी गडचिरोली, नंदुरबारसारख्या दुर्गम भागातही या परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे, जेणेकरून येथील सुविधांना मूकनाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ घेता यावा आणि कला क्षेत्रात नाव कमवता यावे. यंदाच्या परीक्षेचा निकाल जानेवारी २०२६ मध्ये जाहीर करण्यात येणार आहे. तसेच न गुणवंत विद्यार्थ्यांसाठीच्या पुरस्कार रकमेत वाढ करण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी समान उत्साहाने सहभाग नोंदवला, यामुळे राज्यातील कला क्षेत्राचा विकास सर्वत्र वाढत असल्याचे इंगळे यांनी नमूद केले. अनेक प्राथमिक शाळांमध्ये कला शिक्षकांची कमतरता असल्याने शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी शिक्षकांकडून मागणी करण्यात येत आहे. या सर्व बाबी लक्षात घेता पुढील शैक्षणिक वर्ष कला क्षेत्रासाठी उमेदीचे असणार हे नक्की!