फोटो सौजन्य - Social Media
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक ही भरती मागवण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १११ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांच्या अर्जात काही त्रुटी असतील तर त्याही याकाळात सुधारता येणार आहे अशी महत्वाची नोंद घेण्यात यावी. तसेच नवीन उमेदवारही या भरती प्रक्रियेत सहभाग घेऊ शकत आहेत. ८ नोव्हेंबरपासून या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर ७ डिसेंबर २०२५ पर्यंत उमेदवारांना अर्ज करता तसेच जुन्या उमेदवारांना अर्ज सुधारता येणार आहे. या भरतीची मूळ जाहिरात मूळ जाहिरात ३१ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. पण काही अडचणींमुळे तसेच शैक्षणिक प्रक्रियेमुळे ही भरती रखडली होती.
या भरतीमध्ये सहयोगी प्राध्यापक पदासाठी एकूण ४५ जागा रिक्त आहेत. तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी एकूण ३२ जागा रिक्त आहेत. तर प्राध्यापक पदासाठी एकूण ३३ जागा रिक्त आहेत. ऑनलाइन अर्जाची प्रत जमा करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. तसेच मूळ जाहिरातीचे शुद्धिपत्र ८ नोव्हेंबर २०२५ रोजी विद्यापीठाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
सावित्रीबाई विद्यापीठाच्या संबंधित असणाऱ्या या शिक्षक भरतीची माहिती प्रा. डॉ. संदीप भोळे, शिक्षक कल्याण विभाग यांतर्फे देण्यात आली आहे. इच्छुकांनी लवकर या भरती संबंधित अधिसूचना वाचून योग्य त्या पद्धतीने अर्ज करावा आणि नियुक्त होण्याची सुवर्णसंधी मिळवावी असे आवाहन करण्यात आले आहे.






