फोटो सौजन्य - Social Media
इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस ( ITBP ) पुन्हा एकदा देशामध्ये भरतीची नवी संधी घेऊन आली आहे. कॉन्स्टेबल (चालक) च्या पदासाठी भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना आज पासून अर्ज करता येणार आहे. त्यामुळे संबंधित पदासाठी अर्ज करू पाहणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. या भरतीची प्रतीक्षा मोठ्या प्रमाणात केली जात होती. अखेर, या प्रतिक्षेस पूर्णविराम लागला आहे. ऑक्टोबरच्या ८ तारखेपासून या भरतीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना नोव्हेंबरच्या ६ तारखेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे या भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेचा वेळापत्रक अद्याप जाहीर झालेला नाही.
हे देखील वाचा : अमरावतीतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये नवे उत्कृष्टता आणि संगणक केंद्र ! मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले उद्घाटन
कॉन्स्टेबलच्या पदासाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली असून एकूण ५४५ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीतून नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला संपूर्ण भारतभर काम करता येणार आहे. अधिसूचनेमध्ये काम करण्याचे ठराविक ठिकाण नमूद नाही आहे. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांनी जाहीर झालेल्या अधिसूचनेचा आढावा घ्यावा. विविध निवड प्रक्रियांच्या माध्यमातून उमेदवाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये पाच टप्प्यांच्या समावेश आहे. या सर्व टप्प्यांना उत्तीर्ण उमेदवार या भरतीच्या नियुक्तीस पात्र आहे. पहिल्या टप्प्यात उमेदवाराला Physical Efficiency Test (PET) आणि Physical Standards Test (PST) पात्र करावे लागेल. दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षेचा समावेश आहे. मग उमेदवाराला दस्तऐवजांची पडताळणी करावी लागेल. चालकाच्या पदासाठी भरती असल्याने उमेदवाराला आत्याचे कौशल्य दाखवणे भाग आहे. तसेच वैद्यकीय परीक्षेसह सगळ्या टप्प्यांना पात्र करणाऱ्या उमेदवाराची नियुक्ती या भरतीमध्ये करण्यात येईल.
ITBP च्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्तींना पात्र करणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती वयोमर्यदा तसेच शैक्षणिक आहेत. कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करू पाहणारे उमेदवार दहावी उत्तीर्ण हवेत. तसेच त्यांच्याकडे हेवी मोटार वेहिकल परवाना असणे अनिवार्य आहे. किमान वय २१ वर्षे असणे अनिवार्य आहे. तर जास्तीत जास्त २७ वर्षे वय असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
हे देखील वाचा : धक्कादायक! कॅनडामध्ये रेस्टॉरंटमध्ये वेटर, सेवा कर्मचारीच्या नोकरीसाठी हजारो भारतीय रांगेत
अशा प्रकारे करता येईल अर्ज: