Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JEE Main 2027मध्ये अर्जाबाबत मोठा बदल! दोन फॉर्म भरले असतील तर ‘हा’ नियम लक्षात ठेवा

JEE Main 2027: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) JEE Main 2027 च्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांना 22 नोव्हेंबर 2026 पर्यंत नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 13, 2026 | 03:21 PM
JEE Main 2027 (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

JEE Main 2027 (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • JEE Main 2027 सत्र 1 साठी नोंदणी सुरू!
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2026
  • नवीन अर्जासाठी NTA चा महत्त्वाचा नियम जाहीर!

JEE Main 2027 Registration:  JEE Main ची तयारी करणाऱ्या पोरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. NTA म्हणजेच राष्ट्रीय चाचणी संस्था वर्षातून दोनदा ही परीक्षा घेते. पहिलं सत्र जानेवारीत असतं आणि दुसरं एप्रिलमध्ये असतं. तुम्हाला वाटलं तर एका सत्राला बसा, वाटलं तर दोन्हीला बसा. तुमची मर्जी. पण अर्ज करायचा असेल तर NTA च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच करावा लागेल. JEE Main 2027 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार निर्धारित मुदतीत नियमित शुल्क भरून सत्र 1 साठी अर्ज करू शकतात.

आता सत्र 1 साठी अर्ज चालू झालेत. अर्ज करायची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2026 आहे. त्या आधी रेग्युलर फी भरून अर्ज करायचा आहे. NTA ने परीक्षेचं वेळापत्रक पण जाहीर केलंय. चला, बघूया अर्जाच्या तारखा, परीक्षेच्या तारखा आणि महत्त्वाचे नियम काय आहेत.

JEE Main सत्र 1 ची परीक्षा केव्हा होणार?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, JEE Main 2027 सत्र 1 परीक्षा 20, 21, 22, 23, 24 आणि 28 जानेवारी 2027 रोजी होणार आहे.परीक्षा जानेवारीत होणार आहे.

‘या’ तारखा नीट लिहून घ्या

20, 21, 22, 23, 24 आणि 28 जानेवारी 2027. 25, 26, 27 ला गॅप आहे, 28 ला परत परीक्षा आहे. परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होईल. तुमची शिफ्ट, तुमचं सेंटर, तुमची वेळ, हे सगळं हॉल तिकिटावर असेल. ते आल्यावर नीट तपासून बघा. सेंटर कुठे आहे, किती वाजता पोहोचायचं आहे, हे आधीच बघून ठेवा.

JEE (Main) 2027 Update! 4,90,008 Aspirants Are Already In. Are You?
Over 6.7 lakh forms have already been submitted for JEE (Main) 2027 Session-1.
Don’t wait until the final days. 3 Simple Steps to Lock Your Spot: •Submit your form
•Pay the required fee
•Download your confirmation page
Last Date to Apply: 22 November 2026 Apply Now: https://t.co/tmqRWzsry6 Do you know a JEE 2027 aspirant who still hasn’t registered, tag them in the post! #JEEMain2027 #NTA #JEEAspirants — National Testing Agency (@NTA_Exams) November 12, 2026

शेवटच्या दिवशी गडबड करू नका.

आतापर्यंत किती पोरांनी अर्ज केले?एनटीएने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे की, 10 नोव्हेंबरपर्यंत अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी एकूण 6,70,182 उमेदवारांनी नोंदणी केली असून, त्यापैकी 4,90,008 उमेदवारांनी अर्ज सादर केला आहे आणि परीक्षा शुल्क भरले आहे.

NTA ने X वर पोस्ट टाकून सांगितलंय, 10 नोव्हेंबरपर्यंत 6,70,182 पोरांनी नोंदणी केलीय. त्यातले 4,90,008 पोरांनी अर्ज पूर्ण करून फी पण भरलीय. अजून 1 लाख 80 हजार पोरं आहेत, ज्यांनी फक्त नोंदणी केलीय, पण अर्ज पूर्ण केलेला नाही. तुम्ही पण त्यात असाल तर लवकर अर्ज पूर्ण करा. 22 नोव्हेंबरची वाट बघत बसू नका. शेवटच्या दिवशी वेबसाईट स्लो होते, अडकते.

NTA चा नवीन नियम काय आहे?

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या अधिकृत घोषणेनुसार, उमेदवार JEE Main सत्र 1 साठी नवीन अर्ज सादर करू शकतात.आता NTA ने एक नवीन नियम सांगितलाय. ज्यांना वाटतंय, माझ्या जुन्या अर्जात चूक झालीय, फोटो चुकीचा गेलाय, सही चुकलीय, किंवा काहीतरी गडबड झालीय, ते नवीन अर्ज भरू शकतात. ज्यांनी आधीच अर्ज नंबर घेतलाय किंवा फी भरलीय, त्यांना पण ही सोय आहे.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा. NTA ने साफ सांगितलंय, ज्या अर्जाची फी यशस्वीरित्या भरली गेलीय आणि ज्याचं कन्फर्मेशन पेज तयार झालंय, तोच अर्ज अंतिम आणि वैध मानला जाईल. म्हणजे फक्त फॉर्म भरून चालणार नाही, फी भरली पाहिजे आणि कन्फर्मेशन पेज आलं पाहिजे. ते पेज डाउनलोड करून ठेवा, प्रिंट काढून ठेवा.नवीन अर्ज भरला तर जुन्या अर्जाचं काय होईल?एनटीएच्या (NTA) मते, जर उमेदवाराने नवीन अर्ज सादर केला परंतु परीक्षा शुल्क जमा केले नाही किंवा पुष्टीकरण पृष्ठ (confirmation page) तयार झाले नाही, तर त्यांचा जुना अर्ज वैध राहील.

हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. नवीन अर्ज भरला तर जुना बाद होईल का? तर NTA म्हणतंय, जर तुम्ही नवीन अर्ज भरला, पण फी भरली नाही किंवा कन्फर्मेशन पेज आलं नाही, तर तुमचा जुना अर्जच वैध राहील. पण त्यासाठी जुन्या अर्जाची सगळी प्रोसेस पूर्ण असली पाहिजे. नवीन अर्ज भरला की नवीन अर्ज नंबर तयार होईल. मग तुम्हाला तुमचा फोटो, सही आणि सगळी कागदपत्रं परत अपलोड करावी लागतील. सगळी माहिती परत भरावी लागेल. त्यामुळे घाई करू नका. आधी जुना अर्ज नीट तपासा. खरंच मोठी चूक असेल तरच नवीन अर्ज भरा. छोटीशी चूक असेल तर करेक्शन विंडोची वाट बघा.थोडक्यात, 22 नोव्हेंबरच्या आधी अर्ज पूर्ण करा. फी भरा. कन्फर्मेशन पेज सांभाळून ठेवा. आणि आता अभ्यासावर लक्ष द्या. जानेवारीची परीक्षा लांब वाटत असली तरी वेळ पटकन निघून जाईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: JEE Main 2027 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

    Ans: JEE Main 2027 सत्र 1 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2026 आहे.

  • Que: JEE Main 2027 सत्र 1 ची परीक्षा कधी होणार आहे?

    Ans: परीक्षा 20, 21, 22, 23, 24 आणि 28 जानेवारी 2027 रोजी होणार आहे.

  • Que: JEE Main 2027 परीक्षेचे हॉल तिकीट कुठे मिळणार?

    Ans: उमेदवारांना NTA च्या अधिकृत वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. त्यावर परीक्षा केंद्र, तारीख आणि शिफ्टची माहिती असेल.

Web Title: Jee main 2027 registration last date exam dates nta new application rules rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 03:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.