फोटो सौजन्य - Social Media
यूरेनियम कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL)मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. मुख्यता सरकारी क्षेत्रात कामाच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरती संबंधित अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. अर्ज कारण्यापुरकवि उमेदवारांनी या जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा. या भरतीच्या प्रक्रियेमध्ये माइनिंग मेट-सी तसेच ब्लास्टर-बी आणि अनेक विविध पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. भरतीला सुरुवात झाली आहे. उमेदवारांना ३० नोव्हेंबर २०२४ या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. ucil.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना अर्ज करायचे आहे. तसेच अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे.
हे देखील वाचा : कॅनडाने स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम व्हिसा कार्यक्रम केला बंद; भारतीय विद्यार्थ्यांना बसणार मोठा फटका
एकूण ८२ रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या पदांमध्ये मायनिंगच्या ६४ जागांचा, ब्लास्टर बीच्या ८ तसेच चालकाच्या १० रिक्त पदांचा समावेश आहे. या रिक्त जागांसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना काही अटी शर्तीचे पालन करावे लागणार आहे. तसेच त्यांना पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती शैक्षणिक तसेच वयोमर्यादे संदर्भात आहेत. या अटी शर्ती अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहेत. जाहीर अधिसूचनमध्ये नमूद असलेल्या या शैक्षणिक अटीनुसार, माइनिंग मेट-सीच्या पदासाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवाराकडे माइनिंग मेटचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवार HSC उत्तीर्ण असावा. ब्लास्टर बीच्या पदासाठी असलेल्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे तसेच उमेदवार SSC उत्तीर्ण हवा. तसेच किमान दहावी उत्तीर्ण शिक्षण झालेल्या उमेदवारांना वाइंडिंग इंजन ड्राइवर-बीच्या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यांच्याकडे संबंधित क्षेत्रामधील प्रमाणपत्र असावे.
अधिसूचनेमध्ये नमूद वयोमर्यादे संबंधित अटीनुसार, किमान ३२ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त ३५ आयु पर्यंत वय असलेले उमेदवार या भरतसीतही अर्ज करू शकतात. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करताना ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. ओबीसी तसेच EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील या भरतीसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क करायचे आहे. तसेच SC , ST, PWD आणि महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे.
हे देखील वाचा : अशा प्रकारे करा UPSC ची तयारी; स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी महत्वाच्या टिप्स
अशा प्रकारे करता येईल अर्ज
सर्व उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट uraniumcorp.in वर जा.
आता मुख्यपृष्ठावरील UCIL भर्ती 2024 लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
यानंतर आवश्यक कागदपत्रे सबमिट करा आणि अर्ज फी भरा.
शेवटी अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवा.