फोटो सौजन्य - Social Media
कर्नाटक बँकेमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती. Customer Service Associate (CSA) या पदासाठी भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती. नोव्हेंबर महिन्यामध्ये या भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती. २० नोव्हेंबर रोजी या भरतीच्या संदर्भात कर्नाटक बँकेने अधिसूचना जाहीर केली होती. या अधिसूचनेमध्ये या भरती संदर्भात संपूर्ण माहिती अगदी सखोल स्वरूपात नमूद आहे. उमेदवारांना अर्ज ऑनलाईन स्वरूपात करता येणार होते. दरम्यान, अर्ज करण्याची मुदत संपली आहे. मोठ्या संख्येने उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले होते.
७ डिसेंबर रोजी या भरतीच्या निवड प्रक्रियेत आयोजित परीक्षेसंदर्भात प्रवेश पत्र जाहीर करण्यात आले आहे. अर्ज कर्त्या उमेदवारांना ते साऊनलोड करता येणार आहे. तसेच महत्वाची बाब म्हणजे परीक्षेला येताना उमेदवारांना प्रवेश पत्र सोबत आणावे लागणार आहे. २० नोव्हेंबर २०२४ या तारखेला अर्ज करण्याची विंडो खुली करण्यात आली होती. तर उमेदवारांना डिसेंबरच्या १ तारखेपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार होते. १५ डिसेंबर रोजी परीकेशेचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज करताना उमेदवारांना काही बाबी आणि अटी शर्तीना पात्र करणे आवश्यक होते.
मुळात, या अटी शर्तीना पात्र करणाऱ्या उमेदवारांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. या अटी शर्ती शैक्षणिक तसेच उमेदवाराच्या वयोमर्यादे संदर्भात होत्या. मुळात, किमान १८ वर्षे आयु असलेले उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. तर जास्तीत जास्त २६ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती. तर अधिसूचनेमध्ये नमूद असणाऱ्या शैक्षणिक अटीनुसार, कोणत्याही मान्यता प्राप्त संस्थेतून पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार होते. एकंदरीत, या भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांना पदवीधर असणे अनिवार्य होते.
निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तीन टप्प्यांमध्ये निवड प्रक्रिया घेण्यात येणार आहे. उमेदवारांना CBT लेखी परीक्षा पात्र करावी लागणार आहे. तसेच दस्तऐवजांची पडताळणीसाठी उमेदवारांना सामोरे जावे लागणार आहे. तसेच अंतिम टप्प्यात वैद्यकीय चाचणीच्या माध्यमातून उमेदवारांना या नियुक्तीस पात्र होता येणार आहे आणि नियुक्ती मिळवता येणार आहे. परीक्षेत सर्व प्रश्न इंग्रजी भाषेत असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला ५ अल्टर्नेटीव असतील. तसेच एक प्रश्न चुकल्यास उमेदवारांचे १/४ गन कापण्यात येतील.