फोटो सौजन्य- iStock
डिजिटल युगात घरातून काम करणे शक्य झाले असल्याने आज असंख्य लोक घरातून काम करण्याला प्राधान्य देत आहे. विशेषत: कोरोना काळानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातच नव्हे तर अवघ्या जगभरात हा ट्रेंड पाहायला मिळत आहे. वर्क फ्रॉम होममुळे भारतातच नव्हे तर परदेशात अनेक अशा नोकरीच्या संधींना आज लक्ष्य करता येत आहे. घरातून काम असल्याने कुटुंबाकडे लक्ष्य देता येते आणि पगारही उत्तम मिळत असल्याने हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. त्यामुळे जर परदेशातील कंपनीत तुम्ही काम करु इच्छित असाल तर तुमच्याकरिता कोणते सर्वोत्तम पर्याय असतील याबाबत जाणून घेऊया.
फ्रीलान्सिंग जॉब
आज अनेक जण फ्रीलान्सिंग जॉंब करत आहेत त्यामध्ये लेखन ग्राफिक डिझाईन, वेब डेव्हलपमेंट, डिजिटल मार्केटिंग इत्यादी क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये तुम्ही तुमचे कामाचे तास ठरवू शकतात. Freelancer आदी प्लॅटफॉर्मवर तुमची प्रोफाईल तयार करुन अपडेट करु शकता. हे कामाचा कालावधी हा क्लायंटच्या आवश्यकतेनुसार असू शकतो.
वेब डेव्हलपमेंट
आजच्या काळात महत्वाचे ठरत असलेले वेब डेव्हलपमेंट तुम्ही घरबसल्या करु शकतात. ज्याकरिता त्यासंबंधी कौशल्ये आणि अनुभव असणे आवश्यक आहे. वेब डेव्हलपमेंट या क्षेत्रात करिअरच्या असंख्य संधी आहेत. तसेच या क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही मोबाईल ॲप्स देखील विकसित करू शकता.
कंटेंट रायटिंग
अनेक परदेशी कंपन्या या कंटेंट रायटिंगसाठी वर्क फ्रॉम होम जॉब देतात. यामध्ये तुम्हाला कंपनीकरिता सोशल मीडिया ते ब्लॉगकरिता रायटिंग करावे लागते. आपण परदेशी कंपन्यांसाठी कंटेंट मार्केटिंग देखील करू शकता.
ग्राफिक डिझाइन
ग्राफिक डिझाइनिंगमध्ये जर तुमचा अनुभव असेल तर तुम्ही कंपन्यांसाठी लोगो डिझाइन करू शकता. तसेच ब्रोशर, पोस्टर्स इत्यादी डिझाइन करण्यासाठी तुम्ही परदेशी कंपनीसोबत काम करू शकता. सोशल मीडियासाठी तुम्ही ग्राफिक्सही तयार करू शकता.
या नोकऱ्यांसाठी काय आवश्यक आहे?
या क्षेत्रात काम करुन घरबसल्या परदेशातील कंपन्यांमध्ये लाखोंच्या पगाराचे पॅकेज मिळवू शकता.