फोटो सौजन्य- iStock
कॅम्पस प्लेसमेंट म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी एक मोठी संधी, जिथे कंपन्या महाविद्यालयांमध्ये येऊन त्यांच्या गुणवत्तेनुसार नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करून देतात. ही प्रक्रिया मुख्यतः अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी असते, मात्र काही कंपन्या प्री-फायनल वर्षातील विद्यार्थ्यांनाही नोकरीचे ऑफर लेटर देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना कॉलेज संपण्याआधीच त्यांच्या करिअरला सुरुवात करण्याची संधी मिळते.
विद्यार्थ्यांनी महाविद्यालय निवडताना त्याच्या कॅम्पस प्लेसमेंट रेकॉर्डचा अभ्यास नक्की करावा. कारण हे प्लेसमेंट रेकॉर्ड विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देऊ शकतात. कॅम्पस प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना उत्तम पगारासह नोकरी मिळण्याची संधी असते आणि बाहेरच्या तुलनेत अधिक सुरक्षितता प्रदान केली जाते.
कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रिया
कॅम्पस प्लेसमेंट अनेक टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाते.
1कंपनी निवड: महाविद्यालय योग्य कंपन्यांची निवड करून विद्यार्थ्यांना त्या कंपन्यांबद्दल माहिती देते.
2. कामाबद्दल माहिती:कंपन्या त्यांच्या कामकाजाबद्दल माहिती देतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे प्रोफाइल समजून घेता येते.
3. अॅप्टिट्यूड टेस्ट: विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि विश्लेषणात्मक कौशल्यांची चाचणी घेतली जाते.
4. ग्रुप डिस्कशन:विद्यार्थ्यांच्या संवाद कौशल्यांची आणि विचार करण्याच्या क्षमतेची चाचणी यामध्ये होते.
5. वैयक्तिक मुलाखत: हा प्लेसमेंट प्रक्रियेतील शेवटचा टप्पा असून, यामध्ये विद्यार्थ्यांचे तांत्रिक व वैयक्तिक दोन्ही पैलू तपासले जातात.
6. ऑफर लेटर:अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीचे ऑफर लेटर दिले जाते.
कॅम्पस प्लेसमेंटचे फायदे
कॅम्पस प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना करिअरमध्ये एक मजबूत सुरुवात मिळते.
1. सुरक्षित नोकरी:विद्यार्थ्यांना कॉलेज संपण्याआधीच नोकरीची खात्री मिळते.
2. उच्च पगार:मोठ्या कंपन्या चांगले वेतन आणि प्रोत्साहन देतात.
3.प्रोफेशनल अनुभव: विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो.
4. कंपनीची माहिती: महाविद्यालय स्वतः विद्यार्थ्यांना योग्य कंपन्यांची माहिती पुरवते, ज्यामुळे फसवणूक टाळता येते.
5. नेटवर्किंग संधी: कॅम्पस प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना नवीन लोकांशी संबंध प्रस्थापित करता येतात.
Campus Placement ची तयारी कशी करावी?
कॅम्पस प्लेसमेंटमध्ये यशस्वी होण्यासाठी तयारी खूप महत्त्वाची आहे.
1. रिज्युमे तयार करा: सीनियर्स किंवा अनुभवी व्यक्तींची मदत घेऊन प्रभावी रिज्युमे बनवा.
2. कंपनीची माहिती मिळवा: प्लेसमेंटसाठी येणाऱ्या कंपन्यांची माहिती घ्या आणि त्यासंबंधी योग्य तयारी करा.
3. अॅप्टिट्यूड टेस्ट सराव: अॅप्टिट्यूड टेस्टचा सराव करण्यासाठी ऑनलाइन प्लेटफॉर्म किंवा कॉलेजमधील ट्रेनिंग प्रोग्रामही उपयुक्त ठरतो.
4. ग्रुप डिस्कशन सराव: मित्रांसोबत विषयांशी निगडीत चर्चा करून आत्मविश्वास वाढवा.
5. मॉक इंटरव्ह्यू ( मुलाखत) : वैयक्तिक मुलाखतीची तयारी करण्यासाठी मॉक इंटरव्ह्यूचा सराव करा. ज्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वास वाढतो. त्याचा फायदा मुख्य मुलाखतीच्या वेळी होतो.
कॅम्पस प्लेसमेंट ही करिअरची सुरवात करण्याची एक सुवर्णसंधी आहे. ही संधी प्राप्त झाल्यास चांगल्या करिअरसाठी ती नक्कीच उपयुक्त ठरते.