फोटो सौजन्य- iStock
व्यवसाय परिवर्तनासाठी एआय प्लॅटफॉर्म सर्विसनाऊने केलेल्या नवीन संशोधनाच्या मते, उदयोन्मुख तंत्रज्ञान भारतातील प्रमुख विकास क्षेत्रांमधील टॅलेंटमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणेल, तसेच २०२८ पर्यंत २.७३ दशलक्ष नवीन टेक रोजगार निर्माण होतील. जगातील झपाट्याने विकसित होत असलेल्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक भारत देश आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या २०२३ मधील ४२३.७३ दशलक्षवरून २०२८ पर्यंत ४५७.६२ दशलक्षपर्यंत वाढवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, ज्यामध्ये ३३.८९ दशलक्ष कर्मचाऱ्यांची भर होण्याचे दिसून येत आहे.
६.९६ दशलक्ष कर्मचाऱ्यांची आवश्यकता
जगातील आघाडीची लर्निंग कंपनी पीअरसनने केलेल्या संशोधनामधून निदर्शनास येते की, रिटेल क्षेत्र रोजगार वाढीचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे, जेथे त्यांच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त ६.९६ दशलक्ष कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. ही वाढ रिटेल व्यावसायिकांना सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन डेव्हलपमेंट आणि डेटा इंजिनीअरिंग अशा क्षेत्रांमध्ये अपस्किल करण्याची बहुमूल्य संधी देते, तसेच त्यांना टेक-संचालित लँडस्केपसाठी सुसज्ज करते. यानंतर उत्पादन (१.५० दशलक्ष रोजगार), शिक्षण (०.८४ दशलक्ष रोजगार) आणि आरोग्यसेवा (०.८० दलशक्ष रोजगार) यांचा क्रमांक येतो, ज्यांना अपेक्षित आर्थिक वाढ आणि टेक परिवर्तनाचे पाठबळ मिळाले आहे.
टेकमधील नोकरीच्या संधीत होत आहे कमालीची वाढ
उद्योगांमध्ये टेक-संबंधित रोजगार वाढत आहे, जेथे क्षेत्रांमधील प्रोफेशनल, सायण्टिफिक व टेक्निकल सर्विसेस, मॅन्युफॅक्चुरिंग आणि टेलिकम्युनिकेशन्स विस्तारीकरणासाठी सज्ज आहेत. या ट्रेण्डमध्ये अग्रस्थानी आहे सॉफ्टवेअर अॅप्लीकेशन डेव्हलपर्स, जेथे १०९,७०० पदांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. इतर उल्लेखनीय पदांमध्ये सिस्टम्स सॉफ्टवेअर डेव्हलपर्स (४८,८०० नवीन रोजगार) आणि डेटा इंजिनीअर्स (४८,५०० नवीन रोजगार) यांचा समावेश आहे. वेब डेव्हलपर्स, डेटा अॅनालिस्ट्स आणि सॉफ्टवेअर टेस्टर्स यांची अनुक्रमे ४८,५००, ४७,८०० व ४५,००० पदांच्या अपेक्षित मागणी वाढली आहे. तसेच, डेटा इंटीग्रेशन स्पेशालिस्ट्स, डेटाबेस आर्किटेक्ट्स, डेटा सायण्टिस्ट्स आणि कम्प्युटर अँड इम्फर्मेशन सिस्टम्स मॅनेजर्स अशा पदांमध्ये ४२,७०० ते ४३,३०० पदांपर्यंत वाढ दिसण्याची अपेक्षा आहे. ऊर्जा, सरकारी सेवा व युटिलिटीज अशा उद्योगांमध्ये देखील उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा प्रभाव दिसून येईल, ज्यामुळे तंत्रज्ञान-संचालित सुधारणांदरम्यान कर्मचारीवर्गामध्ये वाढ होण्याला गती मिळेल.
‘राइजअप विथ सर्व्हिसनाऊ’
या गतीशी संलग्न राहण्यासाठी कंपन्या आणि धोरणकर्त्यांनी एकत्रित प्रयत्न करत कर्मचाऱ्यांना अपस्किल केले पाहिजे आणि तंत्रज्ञान-सक्षम कर्मचारीवर्ग घडवण्याची खात्री घेतली पाहिजे. ‘राइजअप विथ सर्विसनाऊ’ प्रोग्राम जागतिक उपक्रम आहे, जो तरूण इंजीनिअर्सना व्यावहारिक, रोजगार-सुसज्ज कौशल्यांसह सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करतो. या उपक्रमाचा २०२४ पर्यंत जगभरातील उच्च मागणी असलेल्या डिजिटल क्षमतांमध्ये एक लाख व्यक्तींना प्रशिक्षण देण्याचा मनसुबा आहे. ९७,६९५ भारतीयांनी गेल्या १२ महिन्यांमध्ये कंपनीच्या एआय प्लॅटफॉर्मवर कौशल्ये अवगत केली आहेत. सर्विसनाऊने १६ राज्यांमधील २० युनिव्हर्सिटीजसोबत सहयोग करत, तसेच सरकारी संस्था फ्यूचरस्किल्स प्राइम बाय नॅसकॉम आणि एआयसीटीई यांच्यासोबत भागीदारी करत आपला युनिव्हर्सिटी अकॅडेमिक प्रोग्राम देखील लाँच केला आहे. या प्रयत्नांच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले आहे, तसेच टेक उद्योगासाठी रोजगार-सुसज्ज टॅलेंटची पाइपलाइन तयार करत आहे.