फोटो सौजन्य - Social Media
मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ मिळाली आहे. आता विद्यार्थ्यांना १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत या सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहेत.
या विस्तारित वेळापत्रकानुसार, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे प्रवेश सुरू राहणार आहेत. यामध्ये एम.ए. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क; एम. कॉम. (ऍडव्हान्स अकाउंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित), एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. या प्रवेशांसाठी अर्ज https://mucdoeadm.samarth.edu.in/ या संकेतस्थळावर भरता येतील.
हे देखील वाचा : नीट PG स्कोर कार्ड जाहीर; अशा प्रकारे पाहता येईल निकाल
तर पदव्युत्तर प्रथम आणि द्वितीय वर्षासाठीचे एम.ए. (शिक्षणशास्त्र) चे प्रवेश आणि द्वितीय वर्ष एम.ए. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क; एम. कॉम. (अकाऊंट/ मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज – https://idoloa.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावरून भरता येतील.
पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष बीए. बीकॉम, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज – https://idoloa.digitaluniversity.ac/ या संकेतस्थळावरून भरता येतील. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेसंबधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
हे देखील वाचा : भारतातील पहिले विदेशी महाविद्यालयीन कॅम्पस; ‘हे’ कोर्स जातील राबवले
सीडीओईचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते. नजीकच्या काळात पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरु होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही किंवा ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहिले आहे अशा विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण प्रणाली हा एक योग्य पर्याय असून यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन सीडीओईचे संचालक शिवाजी सरगर यांनी केले आहे.