फोटो सौजन्य - Social Media
बाहेरच्या देशामध्ये काम करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन काम करण्यास आणि आपले करिअर घडवण्यास इच्छुक आहात तर या संधीचा फायदा तुम्ही नक्कीच घेतला पाहिजे. मुळात, ही संधी लोको पायलटच्या पदासाठी पुरवण्यात येत आहे. लोको पायलटच्या कामासाठी उत्सुक असलेले किंवा याच क्षेत्रामध्ये अनुभव असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. महत्वाची बाब अशी आहे कि ‘डॉयचे बान’ ही जर्मन रेल्वे कंपनी आहे. विशेष म्हणजे ही कंपनी जगातील सर्वात मोठी रेल्वे कंपनी आहे. युरोपीय देश जर्मन त्या भागातील सगळ्यात अव्वल देश आहे. हे अनेक कंपन्यांचे माहेरघर आहे. परंतु, या देशामध्ये मानवी बाळाची कमतरता भासत आहे. सध्या जर्मनला मानवी बळाची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांनी देशभरातून मानवी बळ गिओला करण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक असलेले उमेदवार या भरतीच्या प्रक्रियेसाठी अर्ज करत आहेत.
हे देखील वाचा : पर्यटन विभागामध्ये सुपर व्हॅकन्सी; अधिसूचना जाहीर, ‘या’ तारखेपासून करता येणार अर्ज
लोको पायलटच्या पदासाठी मनुष्य बळ कमी पडत असल्याने जर्मनीने उमेदवारांचा शोध जगभरात सुरु केला आहे. जर्मन शासनाने भारतीयांसाठी ९०,००० विजा जाहीर केले आहेत. यावरून हि बाब लक्षात येत आहे कि,” प्राथमिकता भारतीयांना देण्यात येत आहे.” मुळात, DB ही जगातील सर्वात मोठी रेल कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीसाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना जगामध्ये कोठेही नियुक्ती मिळण्याची शक्यता आहे.
मुळात अशी चर्चा सुरु आहे कि, DB या जर्मन रेल कंपनीचा मुख्य उद्देश भारतीय बाजारपेठेमध्ये पकड जमवणे आहे. ही पकड जमवण्यासाठी जर्म सरकार प्रयत्नशील आहे. भारतामध्ये रेल्वे संबंधित अनेक मोठमोठे प्रोजेक्ट्स सुरु आहेत. देशात मेट्रोच्या कामाला वेग आले आहे. त्यामुळे DB या रेल कंपनीला भारतीय बाजाराविषयी आकर्षण असणे साहजिक आहे. DB या रेल कंपनीचे CEO निको वारबैनॉफ म्हणतात कि, “जर्मनीमध्ये ट्रेन ड्रायव्हर्सची कमतरता आहे आणि आम्हाला आमच्या जागतिक प्रकल्पांसाठी भारतीय कामगारांच्या कौशल्याचा फायदा घ्यायचा आहे.” एकंदरीत, जागतिक स्तरावर आपल्या व्यापाराचे वर्चस्व मिळवण्यासाठी केले गेलेले हे अतोनात पर्यटन आहेत.
हे देखील वाचा : बी.जी.देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेची घोषणा ! या तारखेपर्यंत घेता येणार सहभाग, वाचा स्पर्धेचे नियम
डोईचे बानकडून माहिती आली आहे कि प्रकल्पासाठी एकूण १०० भारतीय उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. या भरतीमध्ये सामाविष्ट करण्यात आलेले १७% उमेदवार हे मूळचे भारतीय आहेत. DB या रेल कंपनीचे CEO निको वारबैनॉफ म्हणतात कि,”आम्ही उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबादच्या आसपासच्या भागातील कर्मचाऱ्यांना कामावर घेतले आहे आणि त्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे.” इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी db.jobs/en-en या अधिकृत संकेस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी येथे व्हिजिट करावे.