महापारेषणमध्ये वीजतंत्री पदांसाठी मोठी भरती; 'ही' असेल अर्जासाठी शेवटची मुदत!
नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड (जिल्हा – सातारा) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2024 असणार आहे.
संस्थेचे नाव – महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड (जिल्हा – सातारा)
भरले जाणारे पद – शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री)
पद संख्या – 39 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख -17 सप्टेंबर 2024
नोकरी करण्याचे ठिकाण – कराड, (जिल्हा – सातारा)
वय मर्यादा – १८ ते ३० वय वर्षे (मागासवर्गीयांसाठी ०५ वर्ष शिथिलक्षम)
किती मिळणार आरक्षण
काय आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (एनसीटीव्हीटी) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतुन वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
कसा कराल अर्ज
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड (जिल्हा – सातारा) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 असणार आहे. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराडने आपल्या जाहिरातीत म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी वाचा जाहिरात पहा – https://www.mahatransco.in/uploads/career/career_1725340457.pdf
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा – https://www.apprenticeshipindia.gov.in/
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट – https://www.mahatransco.in/ ला भेट द्या.