'हा' भन्नाट व्यवसाय सुरु करा... मिळेल तब्बल 2 लाख रुपये महिना कमाई! सरकारही करतंय आर्थिक मदत!
गेल्या काही वर्षात देशभरात ऑनलाईन मार्केटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याशिवाय अनेक गोष्टी सध्या बॉक्स बंद स्वरुपात पाठवण्याची प्रथा वाढली आहे. त्यामुळे आता तुम्ही देखील भविष्याच्या विचार करून बॉक्स निर्मिती करण्याच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास तुम्हांला मोठी कमाईची संधी निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला या बॉक्सला मागणी देखील मोठ्या प्रमाणात आहे. ज्यामुळे तुम्हांला या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात कमाई देखील होणार आहे.
कुठे-कुठे मागणी असते या बॉक्सला
ऑनलाईनचा जमाना असल्याने बाजारात सध्या बॉक्सला मोठी मागणी आहे. या व्यवसायामध्ये मेहनत, जिद्द, समर्पण भावना ठेऊन पुर्ण क्षमतेने प्रयत्न केल्यास तुम्हांला यशापासून कोणीही रोखू शकणार नाही. या व्यवसायात मार्केटिंग कौशल्य असणे खुप महत्वाचे आहे. आज बाजारात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू, विविध प्रकारची गिफ्ट, मोबाईल, बुट, चप्पल अशा व्यवसायांकडून या बॉक्सेसला मोठी मागणी आहे. याशिवाय अन्य काही उद्योगांकडून देखील बॉक्सेसला मागणी आहे.
(फोटो सौजन्य – istock)
सरकारही करते आर्थिक मदत
तुम्हांला हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कमी व्याजदरात कर्ज उभारणीसाठी सरकारच्या विविध योजनांचा लाभ देखील मिळू शकतो. यामध्ये महाराष्ट्र सरकारची अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, केंद्र सरकारची मुद्रा लोन योजना अशा योजनांचा लाभ तुम्हांला मिळू शकतो. हा व्यवसाय पुर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी तुम्हांला २० लाख रुपये इतक्या आर्थिक भांडवलाची आवश्यकता असणार आहे. मात्र, तुम्ही छोटेखानी स्वरुपात देखील हा व्यवसाय करु शकतात.
हे देखील वाचा – कांदा दरात घसरणीची शक्यता; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत… वाचा सविस्तर!
हा बॉक्स निर्मिती करण्याचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याकडे 5,500 स्वेअर फुट जागा असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हांला केंद्र सरकारच्या लघू-मध्यम उद्योग विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे. त्यामुळे तुम्हांला सरकारची कर्ज योजना मिळण्यास देखील लाभ होणार आहे. याशिवाय तुम्हांला तुमच्या कंपनीचा परवाना, प्रदुषण प्रमाणपत्र आणि जीएसटी नोंदणी करावी लागणार आहे.
किती होईल कमाई
बॉक्स निर्मिती करण्याच्या व्यवसायातून तुम्हांला २ लाख रुपये इतकी कमाई होऊ शकते. या व्यवसातील नफ्याचे प्रमाण तुम्ही हा व्यवसाय किती क्षमतेने सुरु करता यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे तुम्हांला त्यापेक्षा अधिक किंवा कमी कमाई देखील होऊ शकते.