फोटो सौजन्य - Social Media
कला क्षेत्रामध्ये अनेक जण जातात. परंतु, यामध्ये शिक्षण घेण्यास जाणाऱ्या मुलांना या क्षेत्राबद्दल अनेक गैरसमज असतात. जर एखादा विद्यार्थी कला क्षेत्रात करिअर करण्याचा निर्धार करत आहे. तर त्याच्याकडे असे अनेक द्वार खुले होतात. या क्षेत्रातील विद्यार्थी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, मीडिया, मास कम्युनिकेशन, अध्यापन, फ्लाइंग अटेंडंट, एअर होस्टेस अशा क्षेत्रात आपले करिअर घडवून भाग्य उजाळु शकतो. परंतु, अनेक विद्यार्थी अशा वेळी गोंधळून जातात. अनेक विद्यार्थिनी असतात ज्यांनी कला क्षेत्रात HSC उत्तीर्ण केली असते. परंतु, त्यांना नर्सिंग क्षेत्रामध्ये रस येतो आणि ते वैद्यकीय क्षेत्र असल्याने त्या इच्छेला पूर्ण करण्यास माघार घेतात. पण तुम्हाला ऐकून नवल वाटेल. नर्सिंग जरूरी वैद्यकीय क्षेत्राचा भाग असला तरी या क्षेत्रात करीत घडवण्याची विद्यार्थ्याने विज्ञान क्षेत्रातच HSC केलेली असावी, असे काहीच बंधन नाही. अगदी कला क्षेत्रातील मुलीही यामध्ये करवीर घडवू शकतात.
जर तुम्ही कला क्षेत्रातील आहात आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करू पाहत आहात तर तुम्हाला HSC उत्तीर्ण केल्यावर नर्सिंग मिडवाइफ (ANM) किंवा जनरल नर्सिंग एंड मिडवाइफरी (GNM) या क्षेत्रांमध्ये डिप्लोमा करावे लागेल. या क्षेत्रात शिक्षण घेऊन तुम्ही नर्सिंग क्षेत्रामध्ये आपल्या करिअरचे दरवाजे खुले करू शकता. चला तर मग या दोन्ही कोर्सेज विषयी जाणून घेऊयात:
ऑक्जिलरी नर्सिंग मिडवाइफ (ANM)
ऑक्जिलरी नर्सिंग मिडवाइफ (ANM) हा कोर्स नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करणाऱ्या उमेदवारांसाठी फार महत्वाचा आहे. ANM कोर्स डिप्लोमा कोर्स आहे. या कोर्समध्ये ६ महिन्यांची इंटर्नशिप पुरवली जाते. हे कोर्स करण्यासाठी फार काही मोठी रक्कम खर्च येत नाही. साधारणपणे १०,००० रुपयांपासून ते ६०,००० रुपये इतका शुल्क आकारण्यात येतो. या कोर्ससाठी प्रवेश घेऊ पाहणाऱ्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज करावे. किमान १७ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या कोर्ससाठी प्रवेश घेता येणार आहे. तर जास्तीत जास्त ३५ वर्ष आयु असणारे उमेदवार या कोसरसाठी प्रवेश घेऊ शकतात. विज्ञान शाखेतून HSC उत्तीर्ण विद्यार्थी यात प्रवेश घेऊ शकतात, त्याचबरोबर इंग्रजी विषयासह कला क्षेत्रातून HSC उत्तीर्ण विद्यार्थीही या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात.
जनरल नर्सिंग एंड मिडवाइफरी (GNM)
जनरल नर्सिंग एंड मिडवाइफरी (GNM) कोर्स ANM पेक्षा थोडा महागडं ठरू शकतो. साधारणता या कोर्ससाठी २०,००० रुपये शुल्क आकारण्यात येतात. तसेच १.५ लाखपर्यंत हि रक्कम असू शकते. हा डिप्लोमा कोर्स असून याची कालावधी साडे तीन वर्ष आहे. तसेच उमेदवारांना ६ महिण्यासाठी इंरटर्नशिपही पुरवण्यात येते. या डिप्लोमा कोर्ससाठी इंग्रजी विषयात किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. पात्र उमेदवार ज्यांनी सीबीएसई बोर्ड/मान्यताप्राप्त व्यावसायिक शाखा-हेल्थ केअर सायन्समध्ये 40% गुण मिळवले आहेत, ते देखील या नर्सिंग कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकतात.