फोटो सौजन्य - Social Media
दहावी आणि बारावीची परीक्षा उंबरठ्यावर आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी तयारी कारण्यास सुरुवात केली आहे. तसेच मंत्रीमंडळांनीदेखील यावर तयारी करण्यास सुरुवात केली आहे. परीक्षा केंद्रावरही लगबग सुरु झाली आहे. मंत्रिमंडळांमध्ये विविध प्रकारेच निर्णय आणि चर्चेला उधाण आले आहे. मुळात, या परीक्षेचं वातावरणामध्ये सगळ्यात मोठा मुद्दा असतो. तो म्हणजे पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकरणे.अशामध्ये मंत्रीमंडळाने याबाबतीत निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यात बोर्डाच्या परीक्षेत होणारे कॉपीचे प्रकरण रोकण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. तसेच या संबंधित माहिती देऊन लोकांना जागृत करण्यासाठी २० जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्यात येणार आहे.
नवीन निर्णयाच्या अनुसार परीक्षा केंद्राच्या ठिकाणी परीक्षेमध्ये स्थानिक कर्मचारी कार्यरत न ठेवता, इतर केंद्रांतून त्यांना पाठवण्यात येईल. एकंदरीत, एका परीक्षा केंद्रात तेथील मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच इतर कर्मचारीवर्ग कार्यरत राहणार नसून त्यांना इतर केंद्रावर पाठवण्यात येईल. तसेच त्या परीक्षा केंद्रावर इतर ठिकाणचे मुख्याध्यापिका, शिक्षक तसेच इतर कर्मचारीवर्ग कार्य करण्यास बोलवण्यात येईल. शिक्षण मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचा उद्देश आहे कि वाढते कॉपीचे प्रकरणे थांबवणे किंवा या प्रकरणांना आळा घालणे. दहावी बारावीच्या परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी दहावी तसेच बारावीच्या परीक्षेत ३१ लाख विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. सध्याच्या सुरु निर्णयानुसार, परीक्षा केंद्रांवर त्याच केंद्रातील शिक्षक, मुख्यध्यापक तसेच इतर शालेय कर्मचारी वर्ग कार्यरत असतात. पण आतापासून यामध्ये बदल घडवण्यात आला आहे. कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत, कॉपीचे प्रकरणे रोखण्यासाठी मंत्रिमंडळाने इतर परीक्षा केंद्रातून कर्मचारी वर्ग नियुक्त करावे अशी घोषणा केली आहे. या संदर्भात माहिती स्वतः राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
कॉपीमुक्त परीक्षांसाठी जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आले आहेत. या नव्या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी या दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्राचार्य, मुख्याधापिक यांना जाऊन या संबंधित माहिती पुरवणे, कॉपीमुक्त अभियानाची शपथ घेणे, विद्यार्थ्यांना कॉपी केल्यास कोणती शिक्षा होणार? याबाबत खबर करणे, परीक्षेमध्ये तणावमुक्त वातावरण तयार करण्यापासून रोख घालणे, विद्यार्थ्यांना परीक्षे संदर्भात माहिती पुरवणे तसेच परीक्षेत तणाव न घेता अभ्यास कसे करावे? आणि परीक्षेबाबत संपूर्ण मार्गदर्शन या कॉपीमुक्त परीक्षांसाठी जनजागृती सप्ताहात करण्यात येणार आहे.