MeitY Recruitment 2026: GATE स्कोअरवर थेट केंद्र सरकारची नोकरी! इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयात पदभरती सुरू

MeitY Recruitment 2026: इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात 'वैज्ञानिक बी'च्या २० पदांवर भरती करण्यात आली आहे. GATE स्कोअर, पात्रता, वयोमर्यादा आणि पगाराबद्दल सविस्तर जाणून घ्या.
MeitY Recruitment 2026
फोटो सौजन्य - एआय
Published on: 
Updated on: 

MeitY Recruitment 2026: भारत सरकारअंतर्गत विज्ञान अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक संधी चालून आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने पूर्णवेळ 'वैज्ञानिक बी' (Scientist 'B') पदाच्या एकूण २० जागांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सामान्य केंद्रीय सेवा गट 'अ' श्रेणीतील या पदांसाठी मंत्रालयांच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल.

मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार या २० रिक्त जागांची दोन प्रमुख तांत्रिक शाखांमध्ये विभागणी कली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी १० तर कॉम्पुटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी १० पदे निश्चित करण्यात आली आहेत.

शैक्षणिक पात्रता काय आहे?

या पदांसाठी संबंधित विषयातील GATE २०२४, २०२५ किंवा २०२६ चा वैध स्कोअर असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक पात्रता म्हणून फिजिकल सायन्स, मॅथेमॅटिकल सायन्स किंवा कॉम्प्युटेशनल अँड इन्फॉर्मेशन सायन्सशी संबंधित विहित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी (Master's Degree) असणे आवश्यक आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, आयटी (IT), इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, एआय (AI), डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी यांसह अधिसूचनेत नमूद केलेल्या विषयांतील किमान ४ वर्षांची बी.ई. (BE) किंवा बी.टेक (BTech) पदवीधारक उमेदवारही अर्ज करण्यास पात्र ठरतील.

MeitY Recruitment 2026
Chandrakant Patil Decision: शासनाचा अनोखा उपक्रम! एकल मातांच्या पाल्यांना उच्च शिक्षणात मिळणार....

वयोमर्यादा आणि वेतन (Salary)

अनारक्षित (खुल्या) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) प्रवर्गातीतल उमेदवारांचे वय ३० वर्ष तर मागासवर्गीय (OBC) ३३ वर्ष आणि अनुसूचित जाती - जमाती (SC/ST) प्रवर्गासाठी ३५ वर्ष निश्चित करण्यात आले आहे. तसेच दिव्यांग उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५६,१०० ते १,७७,५०० इतके वेतन दिले जाईल. त्यासोबत शासकीय भत्ते आणि इतर सुविधांचाही लाभ मिळेल.

MeitY Recruitment 2026
AI in Polytechnic: तंत्रशिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांसाठी मोठे पाऊल! अभ्यासक्रमात केले 'हे' नवीन बदल

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड ही तीन टप्प्यांच्या आधारे केली जाईल. ज्यामध्ये गेट स्कोरद्वारे शॉर्टलिस्टिंग त्यानंतर वैयक्तिक मुलाखत आणि अंतिम निवडीपूर्वी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यामुळे पात्र उमेदवारांनी ऑनलाईन भरती पोर्टल सुरू झाल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

Q

या भरतीद्वारे किती जागा भरल्या जाणार आहेत?

A

इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी १० आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी १० अशा एकूण २० जागा भरल्या जातील.

Q

अर्ज करण्यासाठी मुख्य पात्रता काय आहे?

A

संबंधित विषयातील GATE २०२४, २०२५ किंवा २०२६ चा वैध स्कोअर असणे अनिवार्य असून, संबंधित विषयात मास्टर्स किंवा ४ वर्षांची बी.ई./बी.टेक पदवी आवश्यक आहे.

Q

वयोमर्यादा आणि पगार किती आहे?

A

खुल्या/EWS प्रवर्गासाठी ३० वर्षे, OBC साठी ३३ वर्षे आणि SC/ST साठी ३५ वर्षे वयोमर्यादा आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५६,१०० ते १,७७,५०० रुपये वेतन व भत्ते मिळतील.