फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) मध्ये काम करू पाहणार्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. एकूण २०८ रिक्त जागांसाठी या भरतीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोगामध्ये टाऊन प्लॅनर आणि असिस्टंट टाऊन प्लॅनर च्या रिक्त जागांसाठी या भरतीला सुरुवात केली गेली आहे. १५ ऑक्टोबर २०२४ पासून या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांना ४ नोव्हेंबरपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. तसेच या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भारतीतही इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी या जाहीर अधिकृत अधिसूचनेत आढावा घेण्यात यावा.
हे देखील वाचा : भारतीय रेल्वेत स्पेशल भरती; क्रीडा क्षेत्रातील उमेदवारांना करता येईल अर्ज
MPSC द्वारे आयोजित या भरतीच्या प्रक्रियेमध्ये टाऊन प्लॅनरच्या पदासाठी एकूण ६० जागा रिक्त आहेत. तर असिस्टंट टाऊन प्लॅनरच्या १४८ रिक्त पदांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असणार आहे. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यात यावे. येथेच अधिसूचनेचा आढावा घेता येईल आणि भरती विषयक संपूर्ण माहिती मिळवता येईल. मुळात, इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता, इच्छा असल्यास लवकर अर्ज करून घ्यावे. कारण, मुदतीच्या अखेरच्या काळात साईटवर लोढा वाढल्याने अर्ज करणे कठीण होते किंवा अर्ज करताना अडचणी येतात.
MPSC ने या भरतीच्या संदर्भात जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये इच्छुक उमेदवारांच्या शिक्षणा विषयक तसेच इतर गोष्टींसंदर्भात अटी शर्ती देण्यात आल्या आहेत. या अटी शर्तीना पात्र उमेदवारालाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एकंदरीत, या भरतीसाठी अर्ज कर्ता उमेदवार सिविल इंजीनियरिंग किंवा या सबंधित क्षेत्रातील विषयांमध्ये बीई/बी.टेक पदवीधर हवा.
हे देखील वाचा : NTRO मध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात; ७५ रिक्त पदांसाठी उमेदवारांची होणार नियुक्ती
MPSC च्या या भरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. ६ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारांना अर्ज करावयाचे आहे. तर वयोमारायदेनुसार, १८ वर्षे ते ३८ वर्षे आयु असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज कर्ता येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे किमान ३ वर्षे अनुभव असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.