Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा: राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी ५१ लाख

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माझी शाळा, सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत राजस्तरावर प्रथम क्रमांकवर आलेल्या शाळांना प्रत्येकी 51 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार अशी घोषणा  केली आहे.  या अभियानात 1 कोटीहून जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

  • By नारायण परब
Updated On: Oct 12, 2024 | 10:27 PM
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा: राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी ५१ लाख
Follow Us
Close
Follow Us:

माझी शाळा, सुंदर शाळा या अभियाना अंतर्गत राजस्तरावर प्रथम क्रमांकवर आलेल्या शाळांना प्रत्येकी 51 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार अशी घोषणा  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली.

मंत्री  केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारित ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये या  अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला आहे. या अभियानात सुमारे ९५ टक्के शाळांमधील विद्यार्थी  सहभागी झाले होते. यातील काही उपक्रमांची नोंद ही ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्येदेखील झाली आहे.

अभियानात ९८ हजार शाळेतील १ कोटी ९१ लाख विद्यार्थी तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक सहभागी

मागील वर्षीचा उत्साहवर्धक अनुभव विचारात घेऊन यावर्षीदेखील या अभियानाचा दुसरा टप्पा ५ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत राबविण्यात आला. या उपक्रमासदेखील शाळांनी व विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९१ लाख विद्यार्थी तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमुख घटकांवर आधारित एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते, अशी माहिती मंत्री श्री.केसरकर यांनी दिली.

शासनाकडून शाळांसाठी लाखोंची पारितोषिके

या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही वर्गवारीतून राज्य, विभाग आणि जिल्हा पातळीवरील विजेत्या शाळांची यादी आज जाहीर करण्यात आली असून या सर्व विजेत्या शाळांचे मंत्री श्री. केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. राज्य स्तरावर द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ३१ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला २१ लाख, द्वितीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला १५ लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला ११ लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेला ११ लाख, द्वितीय क्रमांकास पाच लाख तर तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल. त्याचप्रमाणे तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेल्या शाळेला तीन लाख, द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख आणि तृतीय क्रमांक मिळविलेल्या शाळेला एक लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

 

Web Title: Mukhyamantri majhi shala sundar shala 51 lakhs each to the state level first prize winning schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2024 | 10:25 PM

Topics:  

  • Deepak Kesarkar

संबंधित बातम्या

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
1

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
2

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

“मराठीच्या नावावरच राज्य केले, तुमचे राजकारणच मराठीच्या नावावर चालते”, दीपक केसरकरांचा नेमका रोख कुणाकडे?
3

“मराठीच्या नावावरच राज्य केले, तुमचे राजकारणच मराठीच्या नावावर चालते”, दीपक केसरकरांचा नेमका रोख कुणाकडे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.