फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल एलिजिबिलिटी कम इन्ट्रन्स टेस्ट (NEET) PG चा स्कोर कार्ड ३० ऑगस्ट २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार होता. या परीक्षेसाठी उपस्थित राहिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोर कार्ड पाहता येणार आहेत. नॅशनल बोर्ड एग्जामिनेशन फॉर मेडिकल सायन्स (NBEMS) ने या परीक्षेच्या स्कोर बोर्ड जाहीर करण्याची दिनांक घोषित केली होती. या परीक्षेसाठी उपस्थित राहिलेले उमेदवार नॅशनल बोर्ड एग्जामिनेशन फॉर मेडिकल सायन्स (NBEMS) च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला स्कोर कार्ड पाहू शकतात आणि त्याचबरोबर त्याला डाउनलोड करू शकतात. natboard.edu.in तसेच nbe.edu.in या संकेतस्थळावर स्कोर बोर्ड पाहता येणार आहे.
हे देखील वाचा : RRB अर्ज प्रक्रियेमध्ये करण्यात आले बदल; आधार कार्ड वेरिफिकेशन अनिवार्य
NEET PG 2024 परीक्षा ऑगस्टच्या ११ तारखेला आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये देशभरातून लाखो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्याचबरोबर परीक्षेला उपस्थिती दर्शवली होती. परीक्षा दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली होती. पहीली शिफ्ट सकाळी ९:३० ते १२:३० दरम्यान आयोजित करण्यात आली होती. यामध्ये एकूण १,०७,९५९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर दुसऱ्या शिफ्टमध्ये १,०८,१७७ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. दुसरी शिफ्ट दुपारी साडे ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये २,२८,५४० विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यातील २,१६,१३६ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली होती. देशभरातील एकूण १७० शहरांमध्ये ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी ४१६ परीक्षा केंद्राची नियुक्ती केली गेली होती.
या सोप्या चरणांमध्ये स्कोअर कार्ड डाउनलोड करता येईल
हे देखील वाचा : भारतातील पहिले विदेशी महाविद्यालयीन कॅम्पस; ‘हे’ कोर्स जातील राबवले
मुळात नीट PG परीक्षा MD, MS , DNB किंवा डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी दिली जाते. यासाठी कट ऑफही विद्यार्थ्यांच्या प्रवर्गावर आधारित आहे. जनरल तसेच EWS प्रवगातील विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ ५० % असून इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ ४५ % आहे.