फोटो सौजन्य - Social Media
नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) ने असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. ही अधिसूचना 11 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी 15 फेब्रुवारी 2025 पासून 1 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आहे. उमेदवारांना carriers.ntpc.co.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज भरावा लागेल. अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहे, याची इच्छुक उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी. NTPC ही भारतातील अग्रगण्य ऊर्जा निर्मिती कंपनी असून, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती केली जात आहे. या पदासाठी काम करू पाहणारे उमेदवार लवकरात लवकर अर्ज नोंदवा.
या भरती प्रक्रियेसाठी ठरवलेली वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे आहे. उमेदवारांचे वय 1 मार्च 2025 रोजी निर्धारित केलेल्या मर्यादेत असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र सरकारच्या नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाईल. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपल्या पात्रतेची तपासणी अधिसूचनेद्वारे करून अर्ज करावा.
NTPC असिस्टंट एक्झिक्युटिव्ह भरतीसाठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. सर्वप्रथम, उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलवले जाईल. शेवटी, पात्र उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल. या तीन टप्प्यांतून यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काही आवश्यक पावले उचलावी लागतील. सर्वप्रथम, अधिसूचना डाउनलोड करून पात्रतेच्या अटी तपासाव्यात. त्यानंतर, “Apply Online” लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज भरावा. अर्ज भरताना, सर्व आवश्यक माहिती योग्य प्रकारे भरावी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. त्यानंतर, अर्ज शुल्क भरून संपूर्ण अर्ज सादर करावा. अर्जाची प्रिंटआउट प्रत भविष्यातील संदर्भासाठी सुरक्षित ठेवावी. Gen/ OBC/ EWS पदांना एकूण ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर इतर आरक्षित प्रवर्गातील (SC/ ST/ PWD) उमेदवारांना या भरतीसाठी निशुल्क अर्ज करता येणार आहे.
भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखांमध्ये अधिसूचना प्रकाशन (11 फेब्रुवारी 2025), ऑनलाईन अर्जाची सुरुवात (15 फेब्रुवारी 2025) आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख (1 मार्च 2025) यांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि अधिक माहितीसाठी NTPC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.