फोटो सौजन्य - Social Media
ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरतीच्या प्रक्रियेतून एकूण १०८ रिक्ते पदे भरण्यात येणार आहे. असिस्टंट एक्जेक्यूटिव्ह इंजिनिअरच्या रिक्त पदांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. संपुर्ण भारतभरात ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी ongcindia.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
अर्ज करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. १० जानेवारी २०२५ पासून उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. तसेच उमेदवारांना २४ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच या भरतीच्या प्रक्रियेमध्ये कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट २३ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून काही रक्कमेची भरपाई करावी लागणार आहे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्कामध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १००० रुपये दिले आहे. तसेच EWS आणि OBC या आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १००० रुपये भरायचे आहे. तसेच SC आणि ST या प्रवर्गातील उमेदवारांना मोफत अर्ज करता येणार आहे. PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क निशुल्क करायचे आहे.
अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याअगोदर काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. यामध्ये शैक्षणिक अटी शर्ती आणि वयोमर्यादे संदर्भात अटी शर्ती नमूद आहेत. भूविज्ञान तसेच अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये ही भरती आयोजित करण्यात आली आहे. यातील १० पदे भूविज्ञान विभागातील आहेत, तर ९८ पदे अभियांत्रिकी विभागातील आहेत. विविध विभागासाठी अटी वेगवेगळ्या आहेत. वयोमर्यादे संदर्भात असणाऱ्या अटीनुसार, विविध प्रवर्गांसाठी वयाची अट वेगेवेगळी आहे. सामान्य प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांसाठी वयाची किमान अट २६ वर्षे तर कमाल अट २७ वर्षे नमूद करण्यात आली आहे. OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान वय २९ वर्षे तर कमाल वय ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही अट ३१ वर्षे ते ३२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर PwBD प्रवर्गातील उमेदवारांना अधिक १० वर्षे सूट देण्यात येईल.
या भरतीमध्ये अर्ज करू पाहणारा उमेदवार B.Tech/M.Tech/Postgraduate मध्ये किमान ६०% गुणांनी उत्तीर्ण हवा. एकूण चार टप्प्यांमध्ये नियुक्तीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यात उमेदवाराला पहिला टप्प्यामध्ये संगणकावर आधारित एकंदरीत CBT परीक्षेस उर्त्तीर्ण करावे लागणार आहे. यानंतरच्या टप्प्यांमध्ये उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल. तसेच यांनतर उमेदवाराला ग्रुप डिस्कशनसाठी उपस्थित रहावे लागणार आहे. अंतिम, टप्प्यात उमेदवाराची नियुक्ती केली जाईल. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी जाहीर अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.