फोटो सौजन्य - Social Media
विदेश मंत्रालयाच्या (MEA) वतीने तरुणांसाठी इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून दिली जाते. या इंटर्नशिप कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये कामकाज समजून घेण्याची आणि शिकण्याची संधी मिळते. हा इंटर्नशिप कार्यक्रम वर्षातून दोन वेळा आयोजित केला जातो. यातील पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान आणि दुसरा टप्पा ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो. तर या कार्यक्रमासाठी इच्छुक उमेदवार या कार्यकाळात या संधीचा फायदा घेऊ शकतात. तसेच या इंटर्नशिप भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या कार्यक्रमाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. महत्वाची विशेष बाब अशी आहे कि या टर्ममध्ये फक्त ३० उमेदवारांची निवड केली जाते. फक्त ३० उमेदवारांना या कार्यक्रमाअंतर्गत संधी दिली जाते. तसेच जर तुम्ही या इंटर्नशिपसाठी अर्ज करू पाहत आहात तर नक्कीच काही पात्रता निकषांना पात्र करणे अनिवार्य आहे. हे पात्रता निकष व्यायोमर्यादेसंदर्भात आहेत तर शैक्षणिक आहेत. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आहात तर तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच जर अर्ज कर्ता उमेदवार पदवीच्या अंतिम टप्प्यात शिकत आहे तर अभ्यासक्रमाचा भाग म्हणून इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकता. या भरतीच्या कार्यक्रमासाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवाराचे वय जास्तीत जास्त २५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
विदेश मंत्रालयाच्या (MEA) वतीने तरुणांसाठी सुरु करण्यात आलेल्या या इंटर्नशिप कार्यक्रमात दोन टप्प्यांमध्ये उमेदवाराची नियुक्ती केली जाते. पहिल्या टप्य्यात उमेदवाराच्या शैक्षणिक कामगिरीच्या आधारावर शॉर्टलिस्टिंग केली जाते. प्राथमिक निवडीनंतर SC/ST/OBC/EWS प्रवर्गातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. दुसऱ्या टप्प्यात साक्षात्कारासाठी उमेदवारांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलावले जाईल. प्रत्येक सत्रासाठी तीन पट उमेदवार साक्षात्कारासाठी निवडले जातील.
निवड झालेल्या उमेदवारांना ₹10,000 प्रतिमाह स्टायपेंड दिले जाते. याशिवाय, त्यांना त्यांच्या राज्य किंवा महाविद्यालयापासून दिल्लीपर्यंत एकदाच इकॉनॉमी क्लास फ्लाइट तिकिट दिले जाणार. महत्वाची बाब अशी आहे कि दिल्लीमध्ये राहण्याची व इतर व्यवस्था उमेदवारांना स्वतः करावी लागते. याशिवाय, पंतप्रधान इंटर्नशिप योजनेलाही नुकतीच सुरुवात झाली असून त्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विदेश मंत्रालयाची इंटर्नशिप ही तरुणांसाठी एक अद्वितीय संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता तपासून वेळेत अर्ज करावा आणि या संधीचा फायदा घ्यावा.