फोटो सौजन्य - Social Media
पावरग्रीड एनर्जी सर्व्हिस लिमिटेड (PGCIL)ने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली होती. महत्वाची बाब म्हणजे या भरतीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून ट्रेनी इंजिनिअर्स आणि ट्रेनी सुपरवाईजरच्या पदासाठी ही उमेदवारांची नियुक्ती करण्यात येत आहे. मुळात, या भरतीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख आहे. या भरतीच्या माध्यमातून ऊमेदवारांची भरती केली जाणार आहे. ट्रेनी इंजिनिअरच्या पदासाठी एकूण ४७ जागा शिल्लक आहेत. तर ट्रेनी सुपरवाईजरच्या पदासाठी एकूण ७० जागा शिल्लक आहेत. इलेक्ट्रिकल विभागातील हे पदे आहेत. उमेदरांनी या पदासनासाठी अर्ज करण्याअगोदर या भरतीविषयाला माहिती जाणून घ्या. या भरती संदर्भांत अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : PGWP मध्ये करण्यात आला बदल; कॅनडा सरकारचा मोठा निर्णय
१६ ऑक्टोबर रोजी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली असून, याच दिवशी उमेदवारांनी अर्ज करण्याची सुरुवात केली होती. शेवटची तारीख आज असल्याने आजच उमेदवारांनी अर्ज करावे. डिसेंबर २०२४ तसेच जानेवारी २०२५ दरम्यानच्या काळात या भरतीसाठी आयोजित असणारी परीक्षा ठेवण्यात येईल. उमेदरांना या भरतीतही अर्ज शुल्क भरायचे आहे. या बाबतीत संपूर्ण माहिती अधिसूचनेमध्ये पुरवण्यात आली आहे. सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या तसेच OBC आणि EWS प्रवार्गातून येणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. वरील अर्ज शुल्कची रक्कम ही ट्रेनी इंजिनिअरची पदासाठी निश्चित करण्यात आली आहे. तर सामान्य क्ष्रेणीतून येणाऱ्या तसेच OBC आणि EWS प्रवार्गातून येणाऱ्या परंतु ट्रेनी सुपरवाईजरच्या पदासाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क करायचे आहे. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करीत येणार आहे.
PGCIL च्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना काही अटी शर्तीना पात्र करावे लागणार आहे. किमान १८ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २८ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. वयोमर्यादेमध्ये आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात येईल. वयोमर्यादेसोबतच उमेदवारांना काही शिक्षणा संबंधित अटी शर्ती पात्र करावे लागणार आहेत. या सर्व अटी शर्ती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.
हे देखील वाचा : AISIL मध्ये ‘या’ पदासाठी व्हॅकन्सी; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज
या भरतीमध्ये काही टप्प्यांमध्ये उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. या टप्प्यांना पात्र करणे उमेदवारांना बंधनकारक आहे. ट्रेनी सुपरवाईजरच्या पदासाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना लेखी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. तर ट्रेनी इंजिनिअरच्या रिक्त जागांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना गेट स्कोरच्या आधारे शॉर्टलिस्ट केले जाईल. उमेदवारांच्या दस्तऐवजांची पडताळणी केली जाईल. तसेच वैद्यकीय चाचणी पात्र करत सर्व टप्प्यांना पात्र उमेदवार या भरतीसाठी नियुक्त होण्यास पात्र आहेत.