फोटो सौजन्य - Social Media
एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेडने भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. एअर इंडियाच्या या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. विविध पदांसाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या रिक्त पदांमध्ये डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर आणि ज्युनिअर ऑफिसर टेक्निकलच्या रिक्त जागांचा समावेश आहे. फक्त इतकेच नव्हे तर अन्य रिक्त जागांसाठी उमेदवारांची नियुक्ती या भरतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे.
हे देखील वाचा : विद्यार्थ्याने AI च्या मदतीने परीक्षेत उत्तरं दिलं म्हणून विद्यापीठाने केलं नापास; प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
aiasl.in ही AISIL ची अधिकृत संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाला उमेदवारांना भेट देता येणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना याच लिंकवर जायचे आहे. तसेच या भरती संदर्भात जाहीर करण्यात आलेले अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी उमेदवारांनी या संकेतस्थळाला भेट द्यावी. चला तर मग या भरतीविषयी अधिक माहिती जाणून घेवूयात. एकूण १०७ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजली आहे. यामध्ये प टर्मिनल प्रबंधक-पॅक्स पदासाठी १ जागा तर ड्यूटी मॅनेजरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे.
उप प्रबंधक- रॅम्पच्या पदासाठी २ रिक्त जागा तर कर्तव्य अधिकारीच्या पदासाठी ३ जागा रिक्त आहेत. तंत्रज्ञान विभागातील कनिष्ठ अधिकारी पदाच्या रिक्त जागांमध्ये एकाची नियुक्ती केली जाणार आहे, तर ग्राहक सेवा कार्यकारी पदासाठी ३५ जागा रिक्त आहेत. तसेच ४५ उमेदवारांना अप्रेंटिसशिप देण्यात येणार आहे. युटिलिटी एजन्ट तसेच रॅम्प ड्राइवरच्या पदासाठी १५ जागा रिक्त आहेत. तर ४ जणांना रॅम्प अधिकारी म्हणून नियुक्त केले जाणार आहे.
या भरती विषयक काही अटी शर्यती जाहीर करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना या अटी शर्ती पात्र करणे अनिवार्य आहे. या अटी शर्ती शैक्षणिक तसेच वयोमर्यादे संदर्भात आहेत. या अटी शर्ती अधिसूचनेमध्ये जाहीर करण्यात आले आहेत. एकंदरीत, विविध पदांसाठी शिक्षण संबंधित अटी देखील वेगवेगळ्या आहेत. अगदी SSC उत्तीर्ण उमेदवारापासून ते MBA मध्ये पदवीधर असणारा उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो. तसेच अधिसूचनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या वयोमर्यादेविषयक अटीनुसार, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची जास्तीत जास्त आयु ५५ निश्चित करण्यात आली आहे.
हे देखील वाचा : UIIC मध्ये भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख; आजच करा अर्ज, अन्यथा संधीला मुकाल
एकंदरीत, ५५ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना काही प्रमाणात सूट देण्यात येईल. OBC प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना वयोमर्यादेमध्ये जास्तीत जास्त ३ वर्षांची सूट देण्यात येईल. तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अधिक ५ वर्षांची सूट वयोमर्यादे देण्यात येईल. यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच इतर प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ५०० रुपये भरावे लागणार आहे.