फोटो सौजन्य - Social Media
देशामध्ये अनेक जण UPSC च्या परीक्षेची तयारी करत असतात. अनेक उमेदवार याला उत्तीर्ण करतात, तर काही अपात्र ठरत पुन्हा प्रयत्न करतात. यामध्ये प्रामुख्याने दोन मुख्य परीक्षा असतात. प्रिलिम्स आणि मेन्स. उमेदवारांना या दोन्ही परीक्षा पात्र कराव्या लागतात. दोन्ही परीक्षांना उमेदवारांना उपस्थित राहावे लागते. या परीक्षा पात्र कराव्या लागतात. प्रिलिम्समध्ये प्रश्न ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असतात. तर मेन्समध्ये प्रश्न निबंध स्वरूपात असतात. यामध्ये मुलाखतीचा एक भाग असतो. UPSC तयारीसाठी कसा अभ्यासक्रम आखावा, कोणत्या टिप्स वापराव्यात, आणि शिस्तबद्ध पद्धतीने कसे पुढे जावे याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
हे देखील वाचा : IOCL मध्ये रोजगाराची संधी; नोकरीसाठी करा अर्ज, जाणून घ्या ‘या’ भरतीविषयी
UPSC देशातील कठीण परीक्षांपैकी एक आहे. या परीक्षेत उद्दिष्टे फार महत्वाची असतात. या परीक्षेत पात्र होण्यासाठी सखू अभयसाची गरज असते. पहिल्यांदा UPSC चे परीक्षा पॅटर्न आणि सिलेबस समजून घ्या. त्यानुसार तुमचा अभ्यासक्रम तयार करा. दररोजचे अभ्यासाचे तास निश्चित करा, जसे की 8-10 तास. यानुसार अभ्यास केला कि नक्कीच या गोष्टीचा फायदा आपल्याला दिसून येईल. NCERT च्या 6 वी ते 12 वी पर्यंतच्या पुस्तकांचा आधार घ्या, कारण हे पुस्तकांमध्ये बेसिक माहिती चांगल्या प्रकारे समजावून दिलेली असते. याशिवाय, UPSC च्या संदर्भासाठी असलेली काही प्रमाणित पुस्तके जसे की लक्ष्मीकांत (राज्यशास्त्र), रमेश सिंह (अर्थशास्त्र), स्पेक्ट्रम (इतिहास) यांचा अभ्यास करा. वर्तमानपत्रांचे वाचन ही UPSC तयारीत महत्त्वाची गोष्ट आहे; त्यासाठी द हिंदू किंवा इंडियन एक्सप्रेस वाचण्याचा नियम ठेवा.
बातम्या पाहत चला. UPSC मध्ये चालू घडामोडींना विशेष महत्व आहे. सामाजिक असो वा आर्थिक, देशात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे. राजकीय बाब आणि जागतिक स्तरावरील प्रत्येक गोष्ट लक्षात हव्यात. मासिक चालू घडामोडींच्या मासिक मॅगझिन्सचा वापर करा, जसे की Yojana आणि Kurukshetra. मेन्स परीक्षेत उत्तर लेखन महत्त्वाचं असतं. योग्य उत्तर लेखनासाठी सराव करा आणि वेळेत लेखन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. मॉक टेस्ट आणि प्रिलिम्ससाठी मोड्युल टेस्ट सिरीजचा वापर करा. यामुळे परीक्षेचा अनुभव मिळेल आणि तुमच्या उत्तर लेखनात सुधारणा करता येईल.
हे देखील वाचा : UPSC CBI असिस्टंट प्रोग्रामरच्या पदासाठी भरतीची प्रक्रिया आयोजित; असे करता येईल अर्ज
जर गरज असेल, तर योग्य मार्गदर्शन मिळवा. कोचिंग संस्थांचा वापर करू शकता, मात्र स्वअभ्यासावर अधिक भर द्या. YouTube वर बरेच चांगले UPSC मार्गदर्शनाचे चॅनेल उपलब्ध आहेत. विविध कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून या क्षेत्राबद्दल संपूर्ण शिक्षण घ्या. UPSC तयारीच्या काळात मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे. नियमित व्यायाम, ध्यानधारणा यांचा वापर करा. यामुळे तयारीदरम्यान आलेला ताण कमी होतो. UPSC परीक्षेत यश मिळवण्यासाठी सातत्य, संयम, आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. एका ठराविक दिशेने अभ्यास करत राहा, दररोज नियोजनानुसार चालत राहा, यश नक्की मिळेल.