फोटो सौजन्य - Social Media
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)ने भरतीला सुरुवात केली आहे. अप्रेंटिशिप पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. IOCL मध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती विषयी जाणून घेण्यासाठी उमेदवारांना अधिसूचनेचा आढावा घेता येणार आहे. उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना IOCL च्या iocl.com या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. उमेदवारांना २९ नोव्हेंबर २०२४ या तारखेपर्यंत या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरती संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिसूचना वाचून काढावी.
हे देखील वाचा : दिवसा ढवळ्या झोपल्याने होतो ‘हा’ आजार; सवय बदला, आरोग्य सुधारेल
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्ती पात्र करावे लागणार आहे. या अटी शर्ती शैक्षणिक आहेत. तसेच एका ठराविक वयोगटातील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून इंजीनियरिंग/टेक्नोलॉजीमध्ये डिप्लोमा धारक असावा. जर डिप्लोमा धारकांसाठी असणाऱ्या अप्रेन्टिसच्या पदासाठी उमेदवार अर्ज करू पाहत आहे तर वरील अट पात्र असणे अनिवार्य आहे. तर नॉन इंजिनिअरच्या पदासाठी अर्ज करू पाहणारे उमेदवार पदवीधर असणे अनिवार्य आहे.
अप्रेन्टिसच्या पदासाठी विविध विभागांमध्ये ही भरतीची प्रक्रिया आयोजली जात आहे. यांत्रिक अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी/इलेक्ट्रॉनिक्स, स्थापत्य अभियांत्रिकी, उपकरणे आणि नियंत्रण अभियांत्रिकी/इंस्ट्रुमेंटेशन असा विविध विभागांमध्ये उमेदवारांची गरज आहे. यांसाठी उमेदवारांना अप्रेंटीशीप देण्यात येणार आहे. प्रत्येक विभागामध्ये २० उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
हे देखील वाचा : लैंगिक संबंधासाठी वयाचे नाही बंंधन, कोणत्याही वयात समाधानासाठी लक्षात ठेवा 6 गोष्टी
एका वर्षाच्या कालावधीसाठी उमेदवारांना ट्रेनिंग दिली जाईल. काम शिकण्याची उत्तम संधोई तरुणीनं या भरतीच्या माध्यमातून मिळत आहे. उमेदवारांना मोफत काम करावे लागणार नाही. उमेदवारांना दरमाह वेतन दिले जाणार आहे. या भरतीच्या माध्यमातून नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना दरमाह वेतन म्हणून 10500 रुपये ते 11500 रुपये इतका दरमाह वेतन दिला जाईल. मुख्य म्हणजे, या भरतीतून उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या परीक्षेला उपस्थित राहावे लागणार नाही आहे. कोणत्याही परीक्षेला उत्तीर्ण न करता शॉर्टलिस्टिंगच्या माध्यमातून उमेदवारांना ही संधी पुरवण्यात येत आहे. आय भरती संबंधित सखोल माहिती जाहीर अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद आहे. अधिक माहितीसाठी तसेच अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेचा आढावा घेण्यात यावा.