फोटो सौजन्य - Social Media
भारतीय नेव्हीसाठी काम करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. अप्रेंटीस पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. एकंदरीत, या भरतीच्या माध्यमातून २१० अप्रेंटिस पदासाठी रिक्त असलेली जागा भरण्यात येणार आहे. पिकून २१० उमेदवाराने अप्रेंटिसशिप पुरवण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. मुळात, अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दोन पर्याय आहेत.
हे देखील वाचा : बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंताच्या विभिन्न पदासाठी भरती; ‘या’ तारखेपासून करता येईल अर्ज
उमेदवार ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांनी ही बाब लक्षात ठेवावी कि उमेदवारांना ५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करायचे आहे. मुदतीनंतर करण्यात आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. नेव्हल रॅपर शिप यार्डच्या या भारतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर या अधिसूचनेचा आढावा घेणे भाग आहे.
यामध्ये या भरती संदर्भात सखोल माहिती पुरवण्यात आली आहे. एका ठराविक वयोगातील उमेदवारांना या भारटोसाठी अर्ज करता येणार आहे. किमान १८ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त २१ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरती मध्ये सहभाग घेऊ शकतात. उमेदवारांनी या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी https://www.joinindiannavy.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करावा. येथेच अधिसूचनेचा आढावा घेता येईल आणि उया भरती संदर्भांत सखोल माहिती पुरवण्यात येईल.
हे देखील वाचा : NHAI मध्ये मॅनेजरच्या पदासाठी भरतीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यांतकर्ता येईल अर्ज
जर उमेदवार ऑफलाईन स्वरूपात अर्ज करण्यास इच्छुक असेल तर भरण्यात आलेले अर्जाचे फॉर्म एका ठराविक पत्त्यावर पाठवावे लागेल. उमेदवारांनी आपला अर्जाचा फॉर्म काळजीपूर्वक भरून,”अधिकारी-प्रभारी, डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूल, नेव्हल शिप रिपेअर यार्ड, नेव्हल बेस, कारवार, कर्नाटक, ५८१ ३०८” या पत्त्यावर पाठवावी. अर्ज ऑनलाईन स्वरूपाचे असो किंवा ऑफलाईन दोघेही अर्ज ५ नोव्हेंबरपर्यंत जमा करायचे आहेत. नेव्हल रॅपर शिप यार्डच्या या भरती प्रक्रियेत अर्ज कर्त्या उमेदवाराला SSC मध्ये किमान ५०% असावेत. तर उमेदवाराला NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संबंधित आयटीआय ट्रेडमध्ये ६५ % गुण मिळाले असावेत, तरच उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.